श्रमिक सेवा संस्थेतर्फे शिवजयंती उत्साहात साजरी

0
62

प्रतिनिधी मेघा पाटील

श्रमिक सेवा संस्था कोल्हापूर यांच्या वतीने श्री सत्य साई सेवा संघटना व नंदादीप नेत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्ररोग तपासणी व मोफत मोतीबिंदू ऑपरेशन शिबिर याचे आयोजन

कोल्हापूर; श्रमिक सेवा संस्थेतर्फे शिवजयंती उत्साहात साजरी श्रमिक सेवा संस्था कोल्हापूर यांच्या वतीने श्री सत्य साई सेवा संघटना व नंदादीप नेत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्ररोग तपासणी व मोफत मोतीबिंदू ऑपरेशन शिबिर याचे आयोजन ताराराणी सांस्कृतिक हॉल मंगळवार पेठ कोल्हापूर येथे करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली यावेळी श्रमिक सेवा संस्थेच्या अध्यक्षा सौ निर्मला कुराडे सेक्रेटरी संशयाच्या पोतदार श्री सत्य साई सेवा संघटनेचे प्रसाद धारवाडकर फेरीवाले शहराध्यक्ष संदीप साळुंखे शिंगोशी मार्केटचे अध्यक्ष अजिंक्य मस्कर संस्थेचे कोषाध्यक्ष पैलवान तुकाराम पाटील व संस्थेच्या उपाध्यक्ष अश्विनी इंगळे यांच्यासह परिसरातील नागरिक फेरीवाले महिला बचत गटातील महिला आदी उपस्थित होत्या.

सदर शिबिराचे आयोजन श्रमिक सेवा संस्था व श्री सत्य साई सेवा संघटना यांच्यामार्फत घरेलू कामगार सभासद बांधकाम कामगार सभासद फेरीवाले व स्टॉल वाले इतर बचत गट इत्यादींच्या साठी या शिबिराचे खास आयोजन संस्थेचे अध्यक्ष सौ निर्मला कुराडे यांच्या पुढाकाराने करण्यात आले. यावेळी शंभर गुणांच्या डोळ्यांची मोफत तपासणी केली तर वीस जणांच्या वर लवकरच नंदादीप नेत्रालयामध्ये मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here