
प्रतिनिधी मेघा पाटील
मुंबईत रंगली Pride of Nation २०२५ ची स्पर्धा*अरोमा प्रोडक्शन आयोजित सर्वश्रेष्ठ सौंदर्यवतीची निवड करणारी स्पर्धा म्हणजे Pride of Nation २०२५ ( Miss, Mr ,Mrs, Kids ) दिमाखात पार पाडली.सगळ्या फॅशनप्रेमी तरुणांचे लक्ष या स्पर्धेकडे लागलेले असते तसेच या स्पर्धेतील मुख्य आकर्षण म्हणजे या स्पर्धेत असणारे अतिशय सुंदर Crown, ही स्पर्धा म्हणजे फक्त सौंदर्याची स्पर्धा नसते, तर ती संपूर्ण व्यक्तिमत्वाची स्पर्धा असते. अशा या स्पर्धेत जिंकण्यासाठी स्वत:चा ठसा उमटवणंही खूप महत्त्वाचं ठरतं. दरवर्षी प्रमाणे या वर्षी ही म्हणजेच ९ फेब्रुवारी २०२५ रोजी विक्रोळी,मुंबई येथे झालेल्या या भव्यदिव्य कार्यक्रमात मिस. प्राइड ऑफ नेशन २०२५ पायल चौहान, गुजरात. मिसेस. प्राइड ऑफ नेशन २०२५ स्मिता माने, मुंबई.या सौंदर्यवती नी कीताबावर आपली मोहर उमटवली तर सोलापूरचा रोहित राठोड याने मिस्टर प्राइड ऑफ नेशन २०२५ हा किताब आपल्या नावावर केला.प्रत्येकामध्ये अंगभूत गुण असतोच ह्या उद्देशाने प्रत्येक स्पर्धकाला सबटायटल Crown मिळाले.Kids नीं ही ह्या स्पर्धेचा आनंद लुटला.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा. श्री . ॲड. प्रकाश हसबे यांनी हजेरी लावली अन कार्यक्रमाची शोभा वाढवली.कार्यक्रमाचे आयोजन अरोमा प्रोडक्शन चे आयोजक श्री. राकेश मोरे आणि सौ. प्रियांका मोरे (मिस ग्लॅमर इंडिया)यांनी केले होते. तसेच अरोमा प्रोडक्शन चे ब्रँड ॲम्बेसेडर चि. अर्णव मोरे आणि प्राइड ऑफ नेशन चे ब्रँड ॲम्बेसेडर श्री. नितेश भोसले सर्वांना सन्मानित केले.गतविजेता मिस्टर प्राइड ऑफ नेशन २०२३ अमेय पंडत याने इव्हेन्ट हेड म्हणून काम पाहिले, तसेच प्रॉडक्शन हेड प्रफुल्ल साक्य,विशाल सावंत अन टीम राज चामरे, सोमया पठाण, मयूर मुरोडिया यांनी कार्यक्रमाचे नियोजन अतिशय सुंदर पार पाडले. मिस , मिसेस चे ड्रेस डिझाइन डिझायनर शीतल सोनार यांनी केले होते.श्री. अनिल पाचंगे यांनी सुंदर असे Grooming केले अन Modeling साठी सुंदरते सोबतच व्यक्तिमत्व ही खूप महत्वाचे असते हे त्यांनी सर्वांना पटवून दिले.आगामी काळात ही अशाच नव नवीन स्पर्धा तरुणांनसाठी आयोजित करून अरोमा प्रोडक्शन येणाऱ्या सर्व स्पर्धक,मॉडेल्स अन कलाकारांना एक रंगमंच उपलब्ध करून देईल अशी ग्वाही आयोजक श्री राकेश मोरे आणि सौ. प्रियांका मोरे यांनी सर्वाना दिले.