
प्रतिनिधी बाहुबली भोसे
खोची येथील काही दिवसापूर्वी अनेक क्षेत्रात यशस्वी झालेल्या आणि शासकीय परीक्षेतून यश संपादन केलेल्या सुपुत्रांचा कौतुक सोहळा पार पाडण्यात आला. यावेळी या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून हातकणंगले लोकसभेचे खासदार धैर्यशील माने तसेच शिरोळ विधानसभेचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम सोहळा पार पडला. यावेळी खासदार धैर्यशील माने बोलत असताना हातकलंगले पंचायत समितीचे माजी उपसभापती अजय बापूसाहेब पाटील यांना उद्देशून बोलताना हीच ती योग्य वेळ भगवा खांद्यावर घेण्याची असे प्रतिपादन धैर्यशील माने यांनी केले.




ज्यावेळी खोची गावच्या विकासासाठी खासदार म्हणून धैर्यशील माने यांनी सर्वात जास्त निधी दिला असे प्रतिपादन हातकलंगले पंचायत समितीचे माजी उपसभापती अजय पाटील यांनी केले. तसेच खोची गावच्या बेरोजगार अनेक तरुणांना शरद साखर कारखाना च्या वतीने रोजगार उभा करण्यात आला. खोची हे गाव माझ्या मतदारसंघात येत नाही तरीसुद्धा या गावावर विशेष प्रेम माझे आहे असे प्रतिपादन शिरोळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केले.




यावेळी खोची गावच्या यशस्वी सुपुत्रांचा सुपुत्रांचा सन्मान आणि सत्कार करण्यात आला. कला क्रीडा संस्कृती आणि शैक्षणिक तसेच शासकीय विभागात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या तरुण-तरुणी आणि ग्रामस्थांचा सत्कार करण्यात आला. तसेच मराठा भवन उभारणीसाठी अहोरात्र झटणाऱ्या मराठा समाजातील तरुणांचा सन्मान करण्यात आला. बौद्ध समाजातील तरुणांनी विविध मागणीची निवेदन आणि धरणग्रस्त बांधव यांनी आपल्या अडचणीचे निवेदन खासदार धैर्यशील माने यांना दिले.





यावेळी राजकुमार पाटील, रमेश जाधव ,किरण पाटील ,यदुराज सूर्यवंशी, नंदकुमार पाटील ,अमोल पाटील, जयराज पाटील, अभय पाटील, अमोल मगदूम,सोनाजी वाघ, सुजित पाटील, बाळासाहेब पाटील,अजय पाटील युवा मंचचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमार बाबर यांनी केले.