लेखक हा जन्माला यावा लागतो: जीवन साळोखेप्रा. सुषमा पाटील यांच्या ‘पुसट रेषा…ठळक रेषा…’ पुस्तकाचे प्रकाशन…

0
152

गारगोटी/ सागर मोरे: वाचनातून व्यासंग वाढतो. व्यासंगातून वाचनाचे व्यसन लागते. वाचल्याशिवाय अभिव्यक्त होता येत नाही आणि यातूनच एका सशक्त लेखकाची निर्मिती होते कारण लेखक हा जन्माला यावा लागतो, असे प्रतिपादन ज्येष्ठ लेखक, पत्रकार व वक्ते जीवन साळोखे यांनी केले. नवोदित लेखिका प्रा. सुषमा पाटील यांच्या ‘पुसट रेषा…ठळक रेषा…’ या पहिल्याच ललितलेख संग्रहाच्या पुस्तक प्रकाशन प्रसंगी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. शिवाजी विद्यापीठाच्या दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राचे संचालक डॉ. कृष्णा भानुदासराव पाटील, चिकोत्रा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रावसाहेब पाटील प्रमुख उपस्थित होते. श्रीकृष्ण सभागृह पाचगाव (ता. करवीर) येथे हा कार्यक्रम संपन्न झाला.

साळोखे पुढे म्हणाले की, एका शिक्षकांनी दुसऱ्या शिक्षकांबद्दल चांगले बोलले पाहिजे. लेखन ही खूप अवघड कला आहे. अहंकारामुळे गुणवत्ता, बुद्धिमत्ता रसातळाला जाते. गुणवत्ता व कार्यक्षमता या बढाया करण्याच्या गोष्टी नाही तर त्या सिद्ध कराव्या लागतात. डॉ. कृष्णा पाटील म्हणाले, माणसाला संक्षेप व विस्तार आवडतो. माणसाने आजूबाजूच्या परिस्थितीला प्रश्न विचारले पाहिजेत. समाज अस्वस्थ होईल असे लेखन झाले पाहिजे. मूळच्या म्हसवे (ता. भुदरगड) येथील कन्या व आकुर्डे गावच्या स्नुषा असणाऱ्या प्रा. सुषमा पाटील या सध्या कोल्हापूर येथील मेन राजाराम हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहेत. त्या उत्कृष्ट वक्त्या व निवेदिका म्हणून परिचित आहेत. त्यांच्या सिद्धहस्त लेखणीतून आकारास आलेली ही त्यांची पहिली साहित्यकृती आहे. डी. पी. सुतार यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. बिद्री साखर कारखान्याचे संचालक राहुल देसाई, आर्या पाटील, आर. वाय. पाटील, विजय काळे, अनिल पाटील, समृद्धी पाटील, प्राचार्य डॉ. गजानन खाडे, प्राचार्य संजय कुंभार, ज्येष्ठ कवी अशोक भोईटे यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी अभिनंदन प्रकाशनचे प्रकाशक त्रिभुवननाथ जोशी, ज्येष्ठ साहित्यिक कुशापराव पाटील, गटशिक्षणाधिकारी दीपक मेंगाणे, अर्जुन पाटील, नितीन बागुल, आनंदा आरेकर, अरुण पाटील, स्वरा पाटील, अमोल साठे, पत्रकार सागर मोरे, संतोष गायकवाड,अनिल पाटील, दिलीप पाटील,अशोक देसाई, अनिल देसाई, मोहन पाटील, संग्राम किल्लेदार, अमोल किल्लेदार, अनिता पाटील, वसुमती किल्लेदार आदी उपस्थित होते. प्रास्ताविक आर. के. पाटील, सूत्रसंचालन सागर माने यांनी केले. तर जी.आर.पाटील यांनी आभार मानले.——–फोटो ओळ: पाचगाव: प्रा. सुषमा पाटील यांच्या पुसट रेषा… ठळक रेषा पुस्तक प्रकाशन प्रसंगी, जीवन साळोखे, डॉ. कृष्णा पाटील, रावसाहेब पाटील, कुशापराव पाटील, राहुल देसाई,आर.वाय पाटील , डॉ खाडे,संजय कुंभार व इतर मान्यवर.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here