
प्रतिनिधी रोहित डवरी
कागल: सकल मराठा समाज कागल यांच्या वतीने कोल्हापूरचे सुपुत्र व इतिहास अभ्यासक श्री इंद्रजीत सावंत यांना जीवे मारण्याची धमकी फोनवरून देत असताना प्रशांत कोरडकर या नराधमाने श्री छत्रपती शिवाजी महाराज व श्री छत्रपती संभाजी महाराज यांच्या बद्दल अर्वाच्य व अवमानकारक भाषा वापरल्याच्या निषेधार्थ त्याच्यावर योग्य ते कायदेशीर कारवाई करून गुन्हा नोंद करण्यात यावा.याबाबतचे लेखी निवेदन कागल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री.गजेंद्र लोहार साहेब यांना देण्यात आले. अशा वक्तव्यामुळे समाजामध्ये जातीय तेढ निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्था बिघडण्याचा प्रयत्न केला जातो, अशा प्रवृत्तीवर वेळीच कायदेशीर कारवाई केली व गुन्हे दाखल केले तर अशा कृत्यांना आळा बसेल असेही या लेखी निवेदनामध्ये म्हटले आहे. यावेळी सकल मराठा समाजाचे अध्यक्ष नितीन दिंडे,सचिन मोकाशी,अजित इंगळे,नितीन काळबर,प्रकाश जाधव,ईगल प्रभावळकर,इंद्रजीत घाटगे,संदेश वास्कर,सचिन घोरपडे,अजित शिरोळे,रुपेश वाघमारे,राहुल चोगुले,सागर घाटगे,अक्षय भोसले,यशवंत चव्हाण,विनायक उपाध्ये,सुनील जाधव,अतुल खद्रे,कैलास पाटील इ.सकल मराठा बांधव उपस्थित होते.
