शिक्षण व तंत्रज्ञान हे समाज परिवर्तन घडविणारे महत्त्वाचे घटक आहेत, त्याच्या सहाय्याने ग्रामीण भागाचा कायापालट घडविण्याचे आवाहन – उपराष्ट्रपती जगदीप धनखड..

0
41

प्रतिनिधी मेघा पाटील

शिक्षण व तंत्रज्ञान हे समाज परिवर्तन घडविणारे महत्त्वाचे घटक आहेत, त्याच्या सहाय्याने ग्रामीण भागाचा कायापालट घडविण्याचे आवाहन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केले. #विकसितभारत हे केवळ स्वप्न नसून निश्चित साध्य असल्याचेही ते के.पी.बी हिंदुजा कॉलेजच्या अमृत महोत्सव सोहळ्यात म्हणाले.

आपला देश आर्थिक महासत्तेच्या दिशेने वाटचाल करत आहे. देशातील युवकशक्ती ही मोठी जमेची बाजू आहे. अत्याधुनिक शिक्षणक्षेत्रात आपण अग्रेसर आहोत. नियोजन हा विकासाचा गाभा असून उद्योगक्षेत्राने शिक्षण क्षेत्रात गुंतवणूक करून दर्जेदार शिक्षणासाठीही योगदान द्यावे. – उपराष्ट्रपती जगदीप धनखड

यशवंतराव चव्हाण सेंटर येथे के.पी.बी हिंदुजा महाविद्यालयाचा अमृत महोत्सव कार्यक्रम उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी उपराष्ट्रपती यांच्या सुविद्य पत्नी सुदेश धनखड, राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, अध्यक्ष अशोक हिंदुजा, हर्षा हिंदुजा, पॉल अब्राहम, प्राचार्य चंद्रकला जोशी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here