
प्रतिनिधी मेघा पाटील
नाशिक प्रतिनिधी : तू सकलांची आई सातजन्माची पुण्याई तुझी थोरवी महान तिन्हीलोकीतुला मान..”स्त्रीशक्ती” च्या सन्मानार्थ जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून क्रिएटिव्ह माईंड इंग्लिश मीडियम स्कूल येथे आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यात आला अतिशय मोठ्या प्रमाणात महिलांनी येथे सहभाग घेतला महिला दिनानिमित्त महिलांकरता वेगवेगळे खेळ स्पर्धा घेण्यात आल्या या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे म्हणून नाशिकच्या प्रसिद्ध उद्योजिका तसेच नमस्ते नाशिक फाउंडेशन च्या अध्यक्ष स्नेहल ताई देव उपस्थित होत्या त्यांच्या अध्यक्षतेखाली विविध कार्यक्रम घेण्यात आले.

जसे पाककला स्पर्धा; रांगोळी स्पर्धा; वेशभूषा स्पर्धा व इतर खेळ घेण्यात आले. कार्यक्रमाच्या वेळी शाळेच्या माननीय मुख्याध्यापिका मनीषा जोंधळे मॅडम, शिक्षक वर्ग सायली जोंधळे,कविता गुरव,पूजा वानखडे, शिल्पा जगताप,तानिया ललवाल, समीक्षा भालेराव, सीमा दानी, संगीता बागुल व कामिनी पटेल व इतर शिक्षक वर्ग उपस्थित होते.स्पर्धेत भाग घेतलेले व विजेत्यांचे पुष्पगुच्छ व बक्षीस देऊन सन्मान करण्यात आले*पाककला स्पर्धेत मोनिका अनिल घाडगे,अश्विनी सचिन पवार,श्रुती सुवास पवार, सायली कमलेश मस्के, नीलम पवन पवार या महिलांनी स्पर्धेत भाग घेऊन सगळ्यांना अचंबित करून खाद्यपदार्थाचे इतके प्रकार असतात हे दाखवले व त्याचा आस्वाद घ्यायला लावला, स्पर्धेचे प्रथम पारितोषिक अश्विनी सचिन पवार,नीलम पवन पवार यांना मिळाले सर्व महिलांनी त्यांचे खूप खूप कौतुक केले.

वेशभूषा स्पर्धेमध्ये रक्षा विजय घेगडमल,रेखा सुनील केदारे,जोशना प्रशांत पवार,संगीता गणेश वारजे, नीलम पवन पवार महिलांनी भाग घेऊन भाग आपल्या भारतीय संस्कृतीचे विविध पैलू दाखवले आहे.रांगोळी स्पर्धेत जयश्री निलेश उगाडे, रक्षा विजय घेगडमल या महिलांनी रांगोळीतून आपल्याला पाणी वाचवा; बेटी बचाव आणि वेगवेगळ्या रंगछटा यांनी दाखवले आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिन क्रिएटिव्ह माईंड इंग्लिश मीडियम स्कूल येथे साजरा करण्यात आला










