
प्रतिनिधी :अभिनंदन पुरीबुवा
कागल : करड्याळ ता. कागल येथे स्मार्ट वीज मीटर बसवण्यासाठी गेलेल्या कर्मचाऱ्याला पाच ते सहाजणांनी धक्काबुक्की करत मारहाण केली. स्मार्ट मीटर बसवायची नाहीत, या मागणीसाठी ग्रामस्थांनी कर्मचाऱ्यांसोबत वाद घातला. यातून मारहाणीची घटना घडली. त्यानंतर या कर्मचाऱ्यांसह अन्य गावांतील काम करणारे कर्मचारी, कंपनीच्या
अधिकारऱ्यानी काम बंद करत मुरगूड पोलिस स्टेशन गाठले. रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू होते.
शनिवारी करड्याळ येथे महावितरण कंपनीने ठेका दिलेल्या अदानी या कंपनीचे कर्मचारी किरण रेडेकर हे स्मार्ट मीटर बसवण्यासाठी गेले होते. त्यांनी दहा-बारा ठिकाणी ग्रामस्थांची समजूत काढून स्मार्ट मीटर बसवली होती; पण एका ठिकाणी काही ग्रामस्थांनी विरोध केला. यावेळी कर्मचाऱ्यांनी ही स्मार्ट मीटर आहेत, प्री-पेड मीटर नाहीत हे समजावण्याचा प्रयत्न केला; पण ते त्यांनी एकूण न घेता पाच ते सहा जणांनी किरण रेडेकर यांना मारहाण केली.