
SP-9 प्रतिनिधी मेघा पाटील
जागतिक महिला दिन निमित्ताने महिला आरोग्य हा उद्देश ठेवून इनरव्हील क्लब ऑफ कोल्हापूर सनराइज व प्रेसिडेंट स्मिता सावंत यांच्या नेतृत्वाखाली महिलांसाठी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन 9 मार्च रोजी सायबर चौक येथे केले होते. महिलांनी महिलांसाठी आयोजित केलेली ही मॅरेथॉन सर्वाइकल कॅन्सर जनजागृती विषयी एक प्रकारची मोहीमच होती. या मध्ये 300 महिलांनी सहभाग घेतला होता……या मॅरेथॉन स्पर्धेला सर्व स्तरातून भरघोस प्रतिसाद मिळाला.


2 किमी,3किमी,4किमी,5किमी.. अंतर धावण्यासाठी चार गट तयार केले होते. अगदी छोट्या मुलींपासून ते मोठ्या वयोगटात सर्वांनी धावण्यासाठी उत्साह दाखवला. मॅरेथॉन स्पर्धेचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून, फुगे सोडून झाले.मॅरेथॉन स्पर्धेच्या ठिकाणी झुंबा, योगा सादर केले गेले. सर्व स्पर्धकांनी यात उत्स्फूर्त भाग घेतला. स्पर्धेचे सूत्रसंचालन वर्षा जोशी यांनी केले. सर्वाइकल कॅन्सर जनजागृती विषयीचे आणि महिला दिनाच्या निमित्ताने सर्व्हिकल कॅन्सर अवेअरनेस व बेटी बचाओ बेटी पडाव चे संदेश देणारे बॅनर हातात घेऊन सर्वांनी यासाठी आपला सहभाग नोंदवला.




मॅरेथॉन स्पर्धेचे बक्षीस वितरण श्री इब्राहिम मुल्ला सर ,प्रेसिडेंट स्मिता सावंत आणि क्लबचे पदाधिकारी यांच्या हस्ते झाले. CPR येथील सिव्हिल सर्जन मॅम ची प्रमुख उपस्थिती होती.स्पर्धेच्या ठिकाणी सर्व मेडिकल सेवा ,वाहतूक सेवा, पोलीस या सर्वांचे काटेकोर नियोजन करण्यात आले होते या स्पर्धेसाठी मॅरेथॉन कमिटी मेंबर्स पूनम सरनाईक, संध्या देवडकर, शिल्पा अष्टेकर. रजिस्ट्रेशन कमिटी.. सारिका पाटील आणि जयश्री पाटील यांनी मेहनत घेतली. क्लबच्या प्रेसिडेंट स्मिता सावंत, सेक्रेटरी नंदिनी पाटील, आय एस ओ दिव्या घाटगे, ट्रेझरर वृषाली बाड, एडिटर पूनम सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली ही मॅरेथॉन यशस्वीपणे पार पडली.



