
प्रतिनिधी मेघा पाटील
प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षीही डॉक्टर बापूजी साळुंखे स्केटिंग प्रशिक्षण केंद्र व राजश्री छत्रपती शाहू महाराज स्केटिंग प्रशिक्षण केंद्राच्या वतीने ऐतिहासिक बिंदू चौक ते लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या पुतळ्यापर्यंत स्केटिंग स्मृति ज्योत रॅली चे आयोजन करण्यात आली. या रॅलीची सुरुवात ऐतिहासिक बिंदू चौक येथून ॲड. कृष्णराज नलवडे व ॲड.आचल रणदिवे. यांच्या हस्ते करण्यात आली. त्यानंतर शहरातील प्रमुख मार्गाने फिरून ही ज्योत बाळासाहेब देसाई यांच्या पुतळ्यासमोर आणण्यात आली. त्या ठिकाणी कोल्हापूर महानगरपालिकेच्या सहआयुक्त.सो. श्वेता दुधाने. यांच्या हस्ते अभिवादन व लहान मुलांचे रॅली सहभाग प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आले. या रॅलीचे संयोजन शिवराज देसाई , कृष्णराज देसाई. राजेंद्र देसाई, भास्कर कदम डॉ. महेश कदम. ॲड. धनश्री कदम. यांनी केले रॅलीमध्ये चार ते सोळा वर्षाच्या मुलांनी सहभाग घेतला.