

कागल उपसंपादक स्वप्निल गोरंबेकर
ना. प्रकाशराव आबिटकर यांना महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय औद्योगिक सहकारी संस्थांच्या वतीने निवेदन दिले . राज्यातील मागासवर्गीय औद्योगिक सह. संस्थाचे पालकत्व घेण्याची केली विनंती.—————————————-‐——-

-मुंंबई दि .11–महाराष्ट्र राज्यातील 375 मागासवर्गीय औद्योगिक सहकारी संस्थांना 2009 साली मान्यता देण्यात आल्या आजपर्यंत या संस्थांना शासनाकडून पुरेसा निधी उपलब्ध करून दिला नाही. शासनाच्या जाचक अटीमुळे हे प्रकल्प अडचणीत सापडले आहेत या औद्योगिक मागासवर्गीय सहकारी संस्थांचे पुनर्जीवन करावे यासाठी महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय मंत्री ना. संजय शिरसाट साहेब आणि राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री याच्याकडे प्रकल्प मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करावेत म्हणून आज कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री नामदार प्रकाशरावजी आबिटकर साहेब यांना मागासवर्गीय औद्योगिक महासं महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने निवेदन दिले त्याचबरोबर मागासवर्गीय संस्थांच्या प्रकल्पामधून लाखो बेरोजगारांना काम मिळणार असल्यामुळे महासंघाच्या वतीने मागासवर्गीय औद्योगिक सहकारी संस्थामहासंघाच्या वतीने विनंती केली.
शिष्टमंडळाचे नेतृत्व संस्था महासंघ अध्यक्ष व रिपब्लिकन पक्ष राज्य संघटन सचिव प्रा.शहाजी कांबळे यांनी केले ,महासंघ कार्याध्यक्ष मोहनराव माने ,महासंघ उपाध्यक्ष प्रमोद कदम, रिपब्लिकन पक्ष पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष कुमार कांबळे,रिपब्लिकन पक्ष ( आठवले) जिल्हा उपाध्यक्ष दिपकराव भोसले,आदी संस्था चालक, पदाधिकाऱ्यांसह उपस्थित होते