
प्रतिनिधी रोहित डवरी
कोल्हापूर : मनामध्ये जिद्द होती म्हणून कोकणकडा सर केला हा कडा सर झाल्यानंतर माझ्याकडे शब्दच नव्हते, माझ्या आयुष्यातील ती न भूतो न भविष्यती” अशी मोहीम होती. जीवनातील अविस्मरणीय क्षण होता. असे प्रतिपादन गिर्यारोहक कु. खुशी विनोद कांबोज यांनी केले महावीर महाविद्यालयात आय.सी.सी , एनसीसी व एनएसएस विभाग यांच्या वतीने आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या ‘गिर्यारोहणातून जीवनाचा आनंद उत्सव कसा असतो ‘ याचे रोमांचकारी व चित्तथरारक अनुभव आपल्या व्याख्यानातून व्यक्त करत सर्वांना मंत्रमग्ध करत खुर्चीमध्ये त्यांनी खिळवून ठेवले. अध्यक्षस्थानी संस्थेच्या संचालिका डॉ. सौ. सुषमा रोटे तर अखिल भारतीय वर्षीय दिगंबर जैन युवा परिषदेच्या कोल्हापूर जिल्हाध्यक्ष सौ. स्नेहलता कापसे , प्रभारी प्राचार्य डॉक्टर उषा पाटील या प्रमुख म्हणून उपस्थित होत्या. खुशी कांबोज म्हणाल्या, गिर्यारोहक व माझे आई -वडील हे दैवत आहेत.माझ्या पाठीमागे पहाडा सारखे उभे राहिल्यामुळे मी गिर्यारोहक म्हणून परिचित झाले.कोकणकडा सर करताना कुठेही न थांबता मोहीम पार केली. छंदामधून स्वतःची ओळख निर्माण करून त्यानंतर आपल्या छंदातून व्यावसायिक स्थैर्य कसे मिळवावे. याबद्दल खुशीने सुंदर मार्गदर्शन केले. सादर केलेल्या डाक्यूमेंटरी फिल्ममधून मुलींनी विचारलेल्या विविध प्रश्नांची उत्तरे खुशी कांबोज हिने दिले.यावेळी खुशी कांबोज व तिच्या पालकांचा सत्कार सौ. स्नेहलता कापसे व संस्थेच्या संचालिका डॉ. सुषमा रोटे यांच्या हस्ते झाला. संस्थेचे संचालक ॲडव्होकेट अभिजित कापसे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी आशुतोष कापसे, कॅप्टन डॉ. सुजाता पाटील, डॉ. शैलजा मंडले उपस्थित होते. डॉ. श्रद्धा पाटील व डॉ.संध्या जाधव यांनी सूत्रसंचालन केले. प्रभारी प्राचार्या डॉ. उषा पाटील यांनी आभार मानले.या कार्यक्रमाचे नियोजन कॅप्टन उमेश वांगदरे व प्रा.श्वेता परुळेकर यांनी केले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते फोटो ओळ : महावीर महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात गिर्यारोहक खुशी विनोद कांबोज हिचा सत्कार करताना . स्नेहलता कापसे व संस्थेच्या संचालिका डॉ. सुषमा रोटे. प्राचार्य डॉ उषा पाटील, डॉ शैलजा मंडले