
प्रतिनिधी श्रीकांत शिंगे
कोल्हापूर, दि. 13 : जिल्हाधिकारी कार्यालयात वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडून विविध तालुक्यातील प्रश्नांबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. छत्रपती शाहूजी सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत पन्हाळा येथील छत्रपती शिवाजी महाराज पुर्नाकृती पुतळा, कागल येथील पुरबाधित शेतकऱ्यांना जमीन, रमाई आवास योजना, आजरा येथील जलजीवन पाणीपुरवठा योजना, कागल एमआयडीसी अशा विविध विषयावर चर्चा करण्यात आली. बैठकीस जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, प्रांताधिकारी समीर शिंगटे, प्रसाद चौगुले, नगर प्रशासन अधिकरी नागेंद्र मुतकेकर, सहायक आयुक्त समाजकल्याण सचिन साळे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.यावेळी पन्हाळा, जि. कोल्हापूर येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासंदर्भात पुतळा तयार करणाऱ्या पुरवठारास तातडीने पुतळा पुर्ण करण्याच्या सूचना केल्या. करनूर, ता. कागल येथील पुरबाधित झालेल्या शेतक-यांना जमीन मिळण्यासंदर्भात प्रस्ताव शासनाकडे आहे परंतु सद्यस्थिती जाणून निवासी उपजिल्हाधिकारी यांनी याबाबत अर्जदारासोबत बैठक घेवून तातडीने विषयाला गती देण्याच्या सूचना मंत्री मुश्रीफ यांनी केल्या. चिखली, ता. कागल येथील केंद्रप्रमुख पदोन्नतीबाबत केलेल्या विनंती अर्जानुसार बैठक घेण्यात आली. याबाबत न्यायालयाच्या निर्णयानुसार पदोन्नतीला स्टे असल्याचे शिक्षणाधिकारी प्राथमिक मीना शेंडकर यांनी सांगितले. अर्जदार व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी एक सुनावणी घेवून त्यांचे म्हणने ऐकावे व नंतर त्यांना पुढिल पर्याय निवडण्याबाबत मार्ग मिळेल अशा सूचना केल्या. पिंपळगाव खुर्द, ता. कागल येथील सिटी सर्व्हे करुन मिळणेबाबत चर्चा झाली. परंतु यापुर्वीच्या बैठकीतील सुचनांनुसार कार्यवाही करण्याच्या सूचना मंत्री मुश्रीफ यांनी दिल्या. 146 रमाई आवास योजनेमधील प्रकरणांबाबत बोलताना पात्र 73 जणांची प्रक्रिया सुरू करण्याच्या निर्देश त्यांनी दिले. इतर बाबत आवश्यक कागदपत्रांची पुर्तता झाल्यावर निर्णय घ्यावा असे ठरले. कापशी, ता. कागल येथील 655 घरांच्या सिटी सर्व्हे नोंदीबाबत बोलताना त्यांनी संबंधित अर्जदारांनी एनए आदेश प्रक्रिया राबवून पुन्हा अर्ज सादर करण्याचे सांगितले. त्यानंतर प्रॉप्रर्टी कार्ड वितरीत होतील. तसेच जिल्हा नियोजन मधून 100 गावांची निवड केली जाणार आहे. त्यावेळी या गावाचा विचार करु असेही ते यावेळी म्हणाले. चिकोत्रा पुनर्वसन शेरे कमी करणेबाबत आलेल्या अर्जावर सर्वच शेरे कमी करण्यात येणार नाहीत. शेतीसाठीच जमीन विक्री करताना कोणत्याही अडचणी येणार नाहीत तसेच याबाबत संबंधित नोंदणी कार्यालयाला लेखी कळवू असेही अपर जिल्हाधिकारी यांनी यावेळी सांगितले. ओसवाल एफ, एम, हँमरले टेक्सटाईल फाईव्ह स्टार, एम.आय.डी.सी एक वर्षापासून बंद असल्याकारणाने कर्मचाऱ्यांचा प्रलंबित प्रश्नांबाबत बैठक घेण्यात आली. यावेळी संबंधित कंपनीचे मालक, कामगार प्रतिनिधी, बँक, कामगार आयक्त कार्यलयाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी मंत्री हसन मुश्रीफ यांनी कामगारांचे देणे कोणत्याही परिस्थितीमध्ये पहिल्यांदा द्या अशा सूचना केल्या. याबाबत त्यांनी कंपनीला 31 मार्चची शेवटची मुदत दिली असल्याचे सांगितले. त्यानंतर कंपनीबाबत पुढील निर्णय घेण्यात येणार आहे.