पंडिता रोहिणी भाटे नृत्य महोत्सव” लवकरच पुण्यात… कलाकारांच्या कलेला दाद देण्यासाठी रसिक पुणेकरांनी आवर्जून या महोत्सवास उपस्थित राहावे – चंद्रकांत पाटील

0
27

पुणे प्रतिनिधी

पुणे, १७ मार्च : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूड मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील आयोजित, शास्त्रीय नृत्य संवर्धन संस्था प्रस्तुत , ५०० हून अधिक नृत्यांगनांच्या कलेचा आविष्कार असलेल्या, नृत्य गुरु पंडिता रोहिणी भाटे नृत्य महोत्सवाचे दुसरे पर्व येत्या २२ आणि २३ मार्च रोजी कोथरूड मधील शुभारंभ लॉन्स, डीपी रोड येथे होत आहे. अतिशय भव्य दिव्य स्वरुपात होणारा हा नृत्य महोत्सव म्हणजे पुणेकरांसाठी जणू मेजवानीच आहे. तरी कलाकारांच्या कलेला दाद देण्यासाठी रसिक पुणेकरांनी आवर्जून या महोत्सवास उपस्थित राहावे, अशी चंद्रकांत पाटील यांनी आग्रहाची विनंती केली आहे. चंद्रकांत पाटील यांनी म्हटले, पुण्यामध्ये कुठलीच कला अशी नाही कि ज्याच्यामध्ये प्राविण्य नाही. खूप मोठमोठे कलाकार पुण्यात आणि प्रामुख्याने कोथरूडमध्ये राहतात. दोन वर्षांपूर्वी देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण झाली त्यानिमित्ताने एक प्रस्ताव असा समोर आला कि शास्त्रीय नृत्यामध्ये पारंगत असलेलया ७०० नर्तिकांनी त्यांची कला सादर करावी. हा प्रस्ताव पूर्ण करण्यात आला. अतिशय बहारदार कार्यक्रम झाला, त्यामुळे हि परंपरा सुरु ठेवावी ते आम्ही सर्वांनी ठरविले. पंडिता रोहिणी भाटे यांच्या नावाने आपण महोत्सव करावा असा प्रस्ताव पाटील यांनी मांडला. त्यामध्ये अनेक कलाकारांनी आपलं नृत्याविष्कार सादर केला. यंदाच्या वर्षी देखील हा महोत्सव सादर केला जाणार आहे. २२ आणि २३ मार्च रोजी सायंकाळी ५. ३० वाजता हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. पाटील पुढे म्हणाले कि रसिकांनी या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यायला तर यावंच परंतु प्रोत्साहन देण्यासाठी जरूर यावं. हळूहळू शास्त्रीय नृत्याचं स्वतंत्र ऑडिटोरियम व्हाव असाही आमचा प्रयन्त सुरु आहे. शास्त्रीय नृत्यामधील परंपरा विकसित होत जावी यासाठी आपण जरूर उपस्थित राहा अशी विनंती चंद्रकांत पाटील यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here