मजले प्रिमियर लिगचा मजले किंग्स आशिष कोठावळे मानकरी – द्वितीय क्रमांक मजले रॉयल्स आकाश हुलवान तर तृतीय क्रमांक मजले सुपरकिंग रजत पाटील…

0
45

प्रतिनिधी – हातकणंगलेमजले ता. हातकणंगले येथे मजले प्रमियर लिग क्रिकेट स्पर्धा उत्साहत पार पडल्या.या स्पर्धेचे उद्घाटन सर्व संघमालकांच्या हस्ते करण्यात आले. गावातील सर्व तरुण मंडळाच्या पुढाकाराने तसेच सर्व समाजातील खेळाडूंनी एकत्र येऊन ह्या स्पर्धेचे आयोजन केले होते.या स्पर्धेतून गावात एकोपा राहावा म्हणून अनेकांनी मदतीचा हात दिला. या स्पर्धेसाठी मजले किंग्स आशिष कोठावळे , सनराईजर्स मजले रविराज कोठावळे, मजले कॅपिटल्य सुधाकर कोठावळे, मजले नाईट रायडर्स स्वप्नील रेडेकर, मजले इंडियन्स प्रशांत कांबळे, मजले सुपरकिंग्ज रजत पाटील, मजले रॉयल्स आकाश हुलवान, रॉयल चॅलेंजर्स मजले सम्मेद पाटील या सर्व संघानी सहभाग घेतला होता.प्रत्येक सामना अटितटीचा झाल्यामुळे स्पर्धेला एक वेगळीच रंगत आली होती.त्यामुळे प्रत्येक संघातील खेळाडू उत्साहाने खेळत होते. फायनल मध्ये पोहचलेल्या दोन्हीही संघातील खेळाडूंनी प्रेक्षकांचा श्वास काही सेंकद रोखून धरावा अशी खेळी करून मजले किंग्जने विजयाची माळ आपल्या गळ्यात घातली. प्रथम क्रमांकाचे बक्षीस मानकरी ठरलेल्या मजले किंग्स आशिष कोठावळे या संघाला देण्यात आले.द्वितीय क्रमांकाचा मान मजले रॉयल्स आकाश हुलवान यांना तर तृत्तीय क्रमांकाचे पारितोषिक मजले सुपरकिंग रजत पाटील.यांनी पटकावले.मॅन ऑफ द मॅच म्हणून राहुल रेडेकर यांना गौरविण्यात आले.गावातील सर्व वातावरण क्रिकेटमय झाले होते.सर्व विजेत्या संघांना पार्थ्वनाथ ज्वेलर्सचे सर्वेसर्वा शितल पाटील यांच्या हस्ते चषक देवून गौरवण्यात आले.या स्पर्धेचे समालोचन म्हणून आकाश हुलवान, संतोष घारगे, संतोष राठोड, रजत पाटील यांनी काम पाहिले तर स्कोअर बोर्ड म्हणून राहुल रेडेकर ,आशिष हुलवान यांनी तरया स्पर्धेचे मुख्य कमेटी कोअर म्हणून सम्मेद पाटील, स्वप्नील रेडेकर, रोहित कुंभोजे यांनी काम पाहिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here