
पुणे प्रतिनिधी: जय भवानी जय शिवाजी या जयघोषात राज्यभरात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठया उत्साहाच्या वातावरणात साजरी करण्यात आली.तर पुणे शहराचा पूर्व भाग म्हणून ओळख असलेल्या सोमवारी पेठेतील विजय मित्र मंडळ ट्रस्ट आणि सम्राट ग्रुप चे आधारस्तंभ भाजपचे नेते पुणे महानगरपालिकेतील माजी सभागृह नेते श्री. गणेश बिडकर, मार्गदर्शक विशाल दरेकर आणि संस्थापक अध्यक्ष शुभम पवार हे मागील तीन दशकांपासून भव्य दिव्य भव्य शिवजयंती महोत्सवाचे आयोजन करीत आले आहेत.तर यंदाच्या वर्षी हिरकणी फेम सिने अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी शिवजयंती महोत्सवाच्या कार्यक्रमाला हजेरी लावून रसिक प्रेक्षकांची मन देखील जिंकली. तसेच या कार्यक्रमा दरम्यान मर्दानी खेळाचे आणि सुरेख अशा मल्लखांब चे प्रात्यक्षिक तरुणांनी करून दाखविले.तर उपस्थित नागरिकांनी टाळ्या वाजवून जय भवानी जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय असा जयघोष करीत प्रात्यक्षिक करणार्या मुलांचे कौतुक देखील केले.या सोहोळ्यास हर्षल दिघे ,ऋषिकेश मोहिते, मानव मोहिते ,शुभम पगारे, धवल मोहिते, अभिषेक गायकवाड, किशोर गायकवाड, प्रणय पगारे ,आर्यन पिसाळ सुमित रामबाडे,अजिंक्य शेळके, निखिल बहिरट ,वसीम शेख, हेमंत शिंदे सनी परदेशी,रोहित गरुड ,आनंद पाटील यांच्यासह हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

या कार्यक्रमा दरम्यान भाजपचे नेते माजी सभागृह नेते गणेश बिडकर म्हणाले, सोमवारी पेठेतील विजय मित्र मंडळ ट्रस्ट आणि सम्राट ग्रुप च्या माध्यमांतून वर्षभर विविध उपक्रम हाती घेण्यात येतात आणि आपण वर्षभर ज्या दिवसाची वाट पाहत असतो,तो दिवस म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आज जगभरात शिवाजी महाराज यांची जयंती मोठया उत्साहाच्या वातावरणात साजरी होत आहे.त्या प्रमाणेच आपल्या पुणे शहरातील पूर्व भाग म्हणून ओळखल्या जाणार्या सोमवारी पेठेत देखील मोठया उत्साहाच्या वातावरणात जयंती साजरी केली जात आहे.याबद्दल मला खूप आनंद होत आहे.छत्रपती शिवाजी महाराज यांनी प्रत्येक पिढीला प्रेरणा आणि संदेश देण्याच काम केल आहे.त्यामुळे मी आणि आपण सर्वजण छत्रपती शिवाजी महाराज यांनी दिलेल्या मार्गावर काम करित राहिले पाहिजे.तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संकल्पनेतील जो महाराष्ट्र होता.जे स्वराज्य होत,ते सर्वांनी मिळून आणण्याचा प्रयत्न करावा,तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सरकारच्या माध्यमातून तो प्रयत्न करीत असून या कामासाठी चळवळ उभारली गेली पाहिजे,असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.*शिवकालीन युद्ध कला शिकवली पाहिजे : अभिनेत्री सोनाली कुलकर्णी* पुणे शहरातील सोमवारी पेठेतील विजय मित्र मंडळ ट्रस्ट आणि सम्राट ग्रुप च्या माध्यमांतून शिवजयंती मोठया उत्साहाच्या वातावरणात साजरी करण्यात आली.आजवर अनेक शिवजयंती च्या कार्यक्रमांना हजेरी लावली आहे.पण येथील शिवजयंती सोहोळा विशेष मनाला भावला,कारण अनेक कार्यक्रमाच्या ठिकाणी महिलांसाठी चांगले वातावरण नसल्यामुळे त्या कार्यक्रमांना महिला जात नाही.पण या महोत्सवामध्ये हजारोंच्या संख्येने महिला वर्ग सहभागी झाला आहे आणि त्या सर्व महिलावर्गाच्या चेहर्यावरील आनंद पाहून एक वेगळेच समाधान दिसत आहे.तसेच समाजातील प्रत्येक महिलेला आदर चा दर्जा दिला पाहिजे आणि तिला सुरक्षित वातावरण दिले पाहिजे,त्याच बरोबर विजय मित्र मंडळ ट्रस्ट आणि सम्राट ग्रुप च्या माध्यमांतून वर्षभरात सामाजिक विविध उपक्रम घेतले जात आहे ही कौतुकास्पद बाब आहे.पण आपण त्याही पुढे जाऊन पुढील पिढीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याबद्दल विविध कार्यक्रम घेतले पाहिजे,तसेच शिवकालीन युद्ध कला शिकवली पाहिजे,अशी भावना सिने अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी व्यक्त केली.