अस्मिता ग्रुपच्या वतीने रंगांची उधळण करत पाण्याचे संवर्धन करून रंगपंचमी मोठ्या दिमाकात साजरी …सौ दीपिका खापणे

प्रतिनिधी मेघा पाटील
कोल्हापूर:अस्मिता ग्रुपच्या वतीने रंगांची उधळण करत पाण्याचे संवर्धन करून रंगपंचमी मोठ्या दिमाकात साजरी …या उपक्रमासाठी महिलांचा उदंड व उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सरनोबतवाडी येथील उजळाई कॉलनीमध्ये सौ दीपिका खापणे यांच्या माध्यमातून अस्मिता ग्रुपच्या वतीने महिलांनी आत्मियता, प्रेम, मैत्री, आदर, एकनिष्ठा, स्त्री शक्ती अशा अनेक रंगांची उधळण करत पाण्याचे संवर्धन करून रंगपंचमी साजरी केली.
हिंदू धर्मातील महत्त्वाच्या सणांपैकी एक असलेल्या होळीच्या अवघ्या पाच दिवसांनी रंगपंचमीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. विशेषत: महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशमध्ये रंगपंचमीचा हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. या सणाशी संबंधित प्रचलित समजुतीनुसार, रंगपंचमीच्या दिवशी देवी-देवतांची श्रद्धेने आणि भक्तिभावाने पूजा केल्याने इच्छित परिणाम प्राप्त होतात. हिंदू कॅलेंडरनुसार, रंगपंचमी हा सण फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या पाचव्या दिवशी साजरा केला जातो.

याचे औचित्य साधून सरनोबतवाडी येथील उजळाई कॉलनीमध्ये सौ दीपिका खापणे यांच्या मार्गदर्शनाखालीव अस्मिता ग्रुपच्यावतीनेरंगांची उधळण करत पाण्याचे संवर्धन करून रंगपंचमी मोठ्या दिमाकात साजरी केली.या उपक्रमावेळी उपस्थित सारिका माळी, अर्चना वर्धन, लता कांबळे, राधिका माने, अफरोज कवठेकर, पार्वती नाईक, ज्योती चंदनवाले, श्वेता गायकवाड, वंदना लोंढे, शिल्पा बोडके, अर्चना शिंगे, प्रभावती वाघरे, आशा ढेरे, पुनम पाटील, चांगुना ठोंबरे, माधुरी मोरे, स्वप्नाली देसाई, संपदा खापणे, लता कांबळे, राधिका माने, मनीषा ढोकरे राजश्री दोन मनी, सविता दोडमणी, शुभांगी चव्हाण, आधी उपस्थित होत्या.यासाठी महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
