
प्रतिनिधी मेघा पाटील
मुंबई प्रतिनिधी: न्यूझीलंडचे पंतप्रधान क्रिस्टॉफर लक्सन यांनी मुंबईच्या बदलेल्या रूपाविषयी आणि सुरू असलेल्या विकास कामांविषयी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून उत्सुकतेनं जाणून घेऊन समाधान व्यक्त केले. यावेळी उपमुख्यमंत्र्यांबरोबर पंतप्रधानांनी विविध विषयांवर चर्चाही केली.
राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांनी न्यूझीलंडच्या पंतप्रधानांच्या सन्मानार्थ राजभवन येथे स्नेहभोजनाचे आयोजन केले होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांसह मान्यवर उपस्थित होते.