उद्याच्या समाजाचे भविष्य महिलांच्या हाती : एस एन पठाण

0
106

प्रतिनिधी : रोहित डवरी राष्ट्रीय महिला सुरक्षा संघटनेच्या अंतर्गत श्री किसनराव काशीद पाटील यांच्या नेतृत्वाखाली पुणे येथे शरद पवार भवन सहकार नगर धनकवडी येथे पार पडलेल्या विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी केलेल्या महिलांचा गुणगौरव आणि सत्कार पुरस्कार रुपी करण्यात आला. यावेळी केंद्रीय सरकार विशेष वकील एडवोकेट मधु हुकमाणी यांच्या अध्यक्षतेखाली या कार्यक्रमाची सुरुवात झाली.

त्यावेळी अध्यक्ष बोलत असताना महिलांनी आपली सुरक्षा आपल्या हिमतीवर करणे अति गरजेचे आहे कोणावरही अवलंबून न राहता स्वतः समाजात धाडसीपणाने वावरणे महत्त्वाचे आहे. असे मार्गदर्शन करत असताना एडवोकेट मधू हुकमाणी यांनी वक्तव्य केले. त्याचबरोबर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून एस एन पठाण सर माझी गुरुकुल राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर अध्यक्ष म्हणून लाभले. अनाथांची माय सिंधुताई संकपाळ यांचे मानसपुत्र माननीय विनय सिंधुताई सपकाळ यांची विशेष उपस्थिती होती.

पुणे शहराच्या मुख्य अभियंता रिनाज पठाण मॅडम यांनी सुद्धा आपल्या ओघवत्या भाषणाच्या शैलीतून उपस्थित आजी मने जिंकली. महिलांच्या भविष्यकालीन व्यवसायासाठी कुटीर व लघु उद्योजक विकास प्रकल्प प्रमुख उपचंद्र शेलार सर यांनी व्यवसाय संदर्भात आणि महिलांच्या सबलीकरण संदर्भात मोठे मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच रॉयल फायनान्स अँड रिअल इस्टेट प्रायव्हेट लिमिटेड कोल्हापूर चे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री बाहुबली भोसे साहेब यांची विशेष उपस्थिती या कार्यक्रमासाठी होती.

या कार्यक्रमाचे नियोजन महिला सुरक्षा संघटना नवी दिल्ली अंतर्गत पुण्याच्या संपूर्ण टीमने केले असून सामाजिक राजकीय आणि आर्थिक विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचा विशेष गौरव सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाच्या आभार संघटनेचे अध्यक्ष माननीय श्री किसनराव काशीद पाटील यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here