पाश्चिमात्य संगीतापेक्षा शास्त्रीय नृत्य आणि संगिताला उपस्थित रसिकांकडून मिळणारी उत्स्फूर्त दाद पाहून मनाला समाधान मिळाले’ – चंद्रकांत पाटील

0
18

पुणे प्रतिनिधी

पुणे : शास्त्रीय नृत्य संवर्धन संस्था प्रस्तुत, “नृत्य गुरु पंडिता रोहिणी भाटे नृत्य महोत्सवाचे” उद्घाटन शनिवारी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, भाजप प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे, नृत्य गुरु शमा भाटे, नृत्य गुरु मनिषा साठे, सुचेता चापेकर, भाजपा सरचिटणीस तथा‌ कार्यक्रमाचे संयोजक पुनीत जोशी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूड मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील आयोजित, शास्त्रीय नृत्य संवर्धन संस्था प्रस्तुत , ५०० हून अधिक नृत्यांगनांच्या कलेचा आविष्कार असलेल्या, नृत्य गुरु पंडिता रोहिणी भाटे नृत्य महोत्सवाचे हे दुसरे पर्व. कोथरूड मधील शुभारंभ लॉन्स, डीपी रोड येथे आयोजित या महोत्सवात अनेक कलाकारांनी आपले कलाविष्कार सादर केले.

हे कलाविष्कार पाहून रसिक श्रोत्यांनी अतिशय उत्स्फूर्त अशी दाद दिली. पुण्याच्या सांस्कृतिक परंपरेला बळकटी देणारा हा अनुभव होता. शास्त्रीय नृत्याचे विविध कलाविष्कार येथे पाहायला मिळाले. या महोत्सवाबाबत बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, या महोत्सवात ५०० पेक्षा जास्त कलाकार आपला कलाविष्कार सादर करत असून, देशातील दोन नामांकित संस्था देखील सहभागी झाल्या आहेत. आजचा हा कार्यक्रम म्हणजे डोळ्याचं पारणं फेडणारा होता. पाश्चिमात्य संगीतापेक्षा शास्त्रीय नृत्य आणि संगिताला उपस्थित रसिकांकडून मिळणारी उत्स्फूर्त दाद पाहून अतिशय आनंद देणारे आणि मनाला समाधान देणारे होते. मुरलीधर मोहोळ यावेळी म्हणाले कि, या महोत्सवाच्या माध्यमातून शास्त्रीय नृत्य आणि संगिताला व्यापक पातळीवरील व्यासपीठ उपलब्ध होत आहे. शिवाय एवढ्या मोठ्या प्रमाणावर कलाकारांचे होणारे सादरीकरण ही एक शास्त्रीय नृत्यप्रेमींसाठी पर्वणीच आहे. दोन दिवसीय या महोत्सवात ५०० पेक्षा जास्त कलाकार आपला कलाविष्कार सादर करणार आहेत. यात देशातील दोन नामांकित संस्थाही सहभागी झाल्या आहेत. पाश्चिमात्य संगीतापेक्षा शास्त्रीय नृत्य आणि संगिताला उपस्थित रसिकांकडून मिळणारी उत्स्फूर्त दाद पाहून अतिशय आनंद देणारे आणि मनाला समाधान देणारे होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here