
प्रतिनिधी मेघा पाटील

कोल्हापूर – दुसऱ्या कोल्हापूर लिजेंडस टेबल टेनिस टुर्नामेंट कोल्हापूर मेडिकल असोसिएशनच्या डॉ.अतुल जोगळेकर सभागृहात उत्साहात पार पडल्या.या स्पर्धा प्रत्येक महिन्याला खेळवल्या जातात.यामध्ये सिंगल्स,डबल्स अशा विविध प्रकारात झालेल्या या स्पर्धेत शंभरहून अधिक डॉक्टर खेळाडू सहभागी झाले होते. विजेत्यांना डॉ .सूर्यकिरण वाघ आणि डॉ.मुकुंद मोकाशी यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली.या स्पर्धेमध्ये एकेरी प्रकारामध्ये विजेतेपद प्रेमजीत रणनवरे तर उपविजेतेपद मनीष पिंगे यांनी पटकावले.

दुहेरी प्रकारामधे विजेतेपद प्रसाद चिपडे आणि सागर गाठे यांनी तर उपविजेतेपद मनीष पिंगे आणि प्रीतम जैन यांनी पटकावले. “बी” ट्रॉफी चे विजेतेपद सुधर्म जामसांडेकर आणि उपविजेतेपद संतोष जोशी यांनी पटकावले.मनीष पिंगे,सुदाम यादव,सचिन चव्हाण,प्रसाद चिपडे यांनी या स्पर्धा निर्धारित वेळेत आणि उत्साहात पार पाडण्याचे काम सर्व खेळाडूंच्या सहाय्याने पूर्ण केले.पुढील महिन्याची स्पर्धा २० एप्रिल रोजी खेळवण्यात येणार आहेत.येणाऱ्या स्पर्धेत जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभाग घेण्याचे आवहन आयोजकांनी केले आहे.