प्रतिनिधी जानवी घोगळे
-
- ‘महापुरुषांना ठराविक जातीच्या बंधनांमध्ये अडकवणे चुकीचे आहे. महापुरुष हे देश घडवणारे महात्मे असतात. त्यांच्या विचारातून या देशाची जडणघडण झाली आहे. येणाऱ्या काळात देशातील वातावरण सुस्थितीत राखण्यासाठी सर्वच समाजाच्या महापुरुषांचे योगदान आपण लक्षात घेऊन मानवतावादी वातावरण निर्मितीसाठी प्रयत्न केला पाहिजे . यासाठी समाजातील प्रभावशाली व्यक्तिमत्व असणाऱ्या व्यक्ती व समाजातील कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले पाहिजे’ असे प्रतिपादन विवेकवादी विचारवंत, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले.

- सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे, मातंग साहित्य परिषद आणि अण्णाभाऊ साठे अध्यासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या प्रभावशाली व्यक्तिमत्व पुरस्कार वितरण प्रसंगी अध्यक्ष म्हणून ते बोलत होते.
- यावेळी कार्यक्रमात पद्मश्री गिरीश प्रभुणे ,पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पराग काळकर, आंतरविद्याशाखीय अभ्यास शाखेचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. संजय तांबट ,ज्येष्ठ साहित्यिक अण्णा धागाटे, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे अध्यासनाचे प्रमुख डॉ. सुनील मडगे ,सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य रवींद्र शिंगणापूरकर सामाजिक कार्यकर्ते संदीपान झोंबाडे, मातंग साहित्य परिषदेचे अध्यक्ष डॉ. धनंजय भिसे यांच्यासह अनेक मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते. रानडे इन्स्टिट्यूट ,डेक्कन जिमखाना पुणे येथे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात महाराष्ट्रातील साहित्य, सामाजिक, कला ,क्रीडा या सर्व क्षेत्रातील व्यक्तींना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे प्रभावशाली व्यक्तिमत्व पुरस्कार 2025 चे वितरण सन्माननीय पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले .
- या निमित्ताने लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर, महर्षी वी.रा. शिंदे व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांची परिषद या निमित्ताने घेण्यात आली.
- या परिषदेमध्ये सर्वच मान्यवरांनी सर्वच महापुरुषांचे विचार देशाला मानवतावादाकडे घेऊन जाणारे आहेत. या दृष्टीने कार्यकर्त्यांनी काम करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन केले.

- कार्यक्रमाच्याप्रसंगी बार्शी येथील चित्रपट, मालिका ,वेब सिरीज या सर्व क्षेत्रांमध्ये काम करणारे बार्शीचे गुणवंत कलावंत संजय श्रीधर कांबळे यांना या निमित्ताने सन्मानित करण्यात आले. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या या AI चित्रांचे प्रदर्शन संजय कांबळे यांनी गेल्या वर्षांमध्ये देशात अनेक ठिकाणी प्रदर्शन सादर केले आहे. त्यांच्या या बहुमूल्य अशा कामगिरीचा गौरव या या कार्यक्रमात करण्यात आला. सन्मानचिन्ह व मानपत्र देऊन संजय कांबळे यांना गौरवण्यात आले . याप्रसंगी संजय कांबळे यांच्या कार्याचा मुक्तकंठाने गौरव करण्यात आला.
- याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक मातंग साहित्य परिषदेचे अध्यक्ष डॉ. धनंजय भिसे यांनी केले तर आभार प्रदर्शन रवींद्र शिंगणापूरकर यांनी केले.
- कार्यक्रमासाठी महाराष्ट्राच्या विविध भागातून अनेक कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. राष्ट्रगीताने कार्यक्रमाचे सांगता झाली.