चंदगड (महागाव) | राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा उत्साहात संपन्न — युवकांचा उत्स्फूर्त सहभाग..

0
17

प्रतिनिधी: रोहित डवरी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चंदगड विधानसभा मतदारसंघाचा मेळावा आज महागाव येथे माजी आमदार राजेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साही वातावरणात पार पडला. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आणि पक्षबांधणीसाठी आयोजित या मेळाव्यात युवकांचा उल्लेखनीय सहभाग दिसून आला.

कार्यक्रमात राजेश पाटील यांनी युवकांना उद्देशून महत्त्वाचे विचार मांडले. “पक्षाच्या युवकांनी सभासद नोंदणी व पदवीधर मतदार नोंदणीसाठी जोमाने काम करावे. निवडणुकांमध्ये पक्षशिस्त पाळत कार्यरत राहिल्यास प्रत्येक प्रामाणिक कार्यकर्त्याला संधी दिली जाईल,” असे ते म्हणाले.

या मेळाव्यास आजरा तालुकाध्यक्ष फडके साहेब, गडहिंग्लज तालुकाध्यक्ष जयसिंग चव्हाण, जिल्हा कार्याध्यक्ष अनिल साळोखे, पुणे पदवीधर मतदारसंघातील इच्छुक प्रताप (भैय्या) माने, चंदगड मतदारसंघाचे ज्येष्ठ नेते बाबासाहेब पाटील आसुर्लेकर, आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष नितीन दिंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

सर्व मान्यवरांनी युवकांनी पक्ष संघटनेत सक्रियपणे सहभागी व्हावे, असे आवाहन केले. मेळाव्यात मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते व युवकांनी सहभाग घेतला. यानिमित्ताने चंदगडमध्ये पक्ष संघटना अधिक बळकट करण्याचा निर्धार पुन्हा एकदा व्यक्त करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here