
कोल्हापूर: कोल्हापूर एन.सी.सी. गट मुख्यालयातील १ महाराष्ट्र बॅटरी एनसीसी या युनिट चे वार्षिक प्रशिक्षण शिबिर २० ऑगस्ट ते २९ ऑगस्ट या कालावधीत एन.सी.सी.भवन, शिवाजी विद्यापीठ परिसर येथे पार पडले.या शिबिरामध्ये विद्यार्थ्यांच्या मध्ये शिस्त, एकता, देश प्रेम निर्माण होण्यासाठी विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. शारीरिक कवायत, ड्रील,रायफल प्रशिक्षण, तसेच सर्व छात्रांना फायरिंग करण्याची संधी देण्यात आली.या कॅम्पचे प्रमुख लेफ्टनंट कर्नल अमित कुमार यांनी छात्र व पालकांशी संवाद साधला यावेळी ‘ विद्यार्थ्याच्या मध्ये शिस्त व देश प्रेम निर्माण करण्यासाठी हे शिबिर आहे,पालकांनी ही आपल्या मुलांना एन.सी.सी.प्रशिक्षणासाठी पाठवावे असे प्रतिपादन केले ‘
सैनिकी प्रशिक्षणाबरोबर डॉ. प्रसन्न करमरकर, यांनी व्यक्तिमत्व विकास, डॉ. विनिता रानडे यांनी आरोग्य व प्रथमउपचार या विषयावर मार्गदर्शन केले.यावेळी कोल्हापूर अग्निशामक दल यांनी आपले प्रात्यक्षिक सादर केले. या शिबिरात कोल्हापूर,सागाव, बिळाशी,शिराळा, सरवडे या ठिकाणच्या विविध शाळा महाविद्यालयातील ३७० एनसीसी छात्र सहभागी झाले होते . कोल्हापूर एनसीसी गट मुख्यालयाचे प्रमुख ब्रिगेडियर आर पैठणकर यांनी या शिबिराला भेट देऊन आयोजकांचे कौतुक केले.या शिबिराचे आयोजन लेफ्टनंट कर्नल अमित कुमार, यांच्या मार्गदर्शनाखाली कॅप्टन उमेश वांगदरे, सुभेदार मेजर बीएम नाईक,सेकंड ऑफिसर संदीप वर्णे, फर्स्ट ऑफिसर स्मिता बाडकर , डी के राव, हवालदार सरोज,हवालदार माधव , हवालदार रमन्ना, हवालदार दास,विवेक कुमार,राजेश यांनी केले.