
SP-9 प्रतिनिधी:रोहित डवरी
आळवे, ता. पन्हाळा (प्रतिनिधी)* –SP-9 मराठी माध्यम समूहाचे मॅनेजिंग डायरेक्टर श्री.सागर शिवाजी पाटील यांना यावर्षीचा *“डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन मेमोरियल नॅशनल अवॉर्ड 2025”* जाहीर झाला असून, *“बेस्ट मीडिया कव्हरेज”* या राष्ट्रीय पुरस्काराने त्यांचा गौरव करण्यात येणार आहे. या मानाच्या सन्मानाबद्दल आळवे गावात त्यांच्या नागरी सत्काराचा कार्यक्रम पार पडला.

याचबरोबर गावातीलच सुपुत्र स्वप्निल अनिल खामकर याची मुंबई मंत्रालय येथे सामान्य प्रशासन विभागामध्ये क्लार्क पदावर निवड झाल्याने त्यांचाही सत्कार करण्यात आला. गावातील दोन तरुणांनी आपल्या कार्याने राष्ट्रीय आणि शासकीय स्तरावर यश संपादन केल्याने आळवेकरांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.कार्यक्रमाला आळवे गावाचे माजी डेप्युटी सरपंच धर्मराज खामकर,प्रताप लाड,दत्तात्रय निकम, प्रकाश पाटील,दत्तात्रेय बच्चे,रणधीर साळोखे स्वप्नील खामकर,अरुण गायकवाड (हवालदार)अनिल गायकवाड, आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दोन्ही यशस्वी तरुणांचा सत्कार करण्यात आला.या प्रसंगी बोलताना माजी डेप्युटी सरपंच धर्मराज खामकर यांनी सांगितले की, *“सागर पाटील यांच्या पत्रकारितेतील प्रामाणिक व निर्भीड कार्यामुळे आळवे गावाचे नाव राष्ट्रीय स्तरावर पोहोचले आहे. तसेच स्वप्निल खामकर यांची शासकीय सेवेत झालेली निवड ही सर्व युवकांसाठी प्रेरणादायी आहे.”*सत्कार सोहळ्यात मान्यवरांनी या दोन्ही तरुणांच्या भावी कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.


