प्रतिनिधी जानवी घोगळे
कोल्हापूर (प्रतिनिधी) –
कोल्हापूर महानगरपालिकेच्या सांस्कृतिक मंडळाच्या वतीने आयोजित “महाराष्ट्र राज्य महोत्सव गणेशोत्सव – २०२५” चा शुभारंभ आज गुरुवार, दि. ४ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता मोठ्या उत्साहात झाला. या वेळी मा. के. मंजुलक्ष्मी, आयुक्त व प्रशासक, कोल्हापूर महानगरपालिका यांच्या शुभहस्ते श्री गणेशाची आरती करण्यात आली.
यावर्षी महापालिकेने १००% प्रदूषणमुक्त, पर्यावरणपूरक गणेशमूर्ती प्रतिष्ठापना करण्याचा संकल्प राबवला असून, ही राज्यभरात आदर्श ठरणारी उपक्रमात्मक सुरुवात ठरली आहे.
कार्यक्रमात प्रदूषण विरहित मूर्ती साकार करणारे प्रसिद्ध कलाकार अवधूत निगवेकर यांचा तसेच पर्यावरणपूरक रंगांची सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या A.P. Paints कंपनीचे श्री अविनाश निगवेकर यांचा विशेष सत्कार मा. आयुक्त व प्रशासक यांच्या हस्ते करण्यात आला.
या उपक्रमाबाबत बोलताना मा. मंजुलक्ष्मी म्हणाल्या –
“कोल्हापूर महापालिकेचा हा गणेशोत्सव पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा आहे. गणेशभक्तांनी आपल्या घराघरात प्रदूषणविरहित, मातीच्या व नैसर्गिक रंगांनी तयार झालेल्या मूर्तींचा स्वीकार करून या उपक्रमात सक्रिय सहभाग घ्यावा. हा उत्सव केवळ धार्मिकतेपुरता मर्यादित न राहता भावी पिढ्यांसाठी पर्यावरणपूरक आदर्श निर्माण करणारा ठरेल.”
कार्यक्रमाला सांस्कृतिक मंडळाचे पदाधिकारी, महापालिकेचे अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, नागरिक व कलाकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या उपक्रमामुळे कोल्हापूर जिल्हा व महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशभर एक आदर्श निर्माण झाला असून, “इको-फ्रेंडली गणेशोत्सव” या उपक्रमाला नवी दिशा मिळाली आहे