प्रतिनिधी जानवी घोगळे
कोल्हापूर, दि. 10 (जिमाका) : रघुनाथ गणपती पाटील, त्र्यंबक विनायक पाटील, म.वा. तेजस्वीनी त्र्यंबक पाटील, नम्रता दिग्विजय पाटील, ओंकार त्र्यंबक पाटील, सर्जेराव कृष्णा शिपुगडे, उदयसिंग शंकरराव पाटील यांच्याकडून एकूण रक्कम रु. 5 लाख 67 हजार 508 इतकी रक्कम वसुल करण्यासाठी स्थावर संपत्ती जप्त करण्यात आली आहे. यामध्ये विक्रीसाठी निश्चित केलेल्या दिवसापूर्वी पुर्वोवत एकूण 5 लाख 67 हजार 508 रुपये रक्कम भरली नाही तर नमुद मालमत्ता तहसिलदार कार्यालय करवीर येथे दि. 29 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता किंवा दुपारी 3 वाजता जाहीर लिलाव करुन विकली जाणार आहे, अशी माहिती करवीरचे तहसिलदार स्वप्निल रावडे यांनी दिली आहे.
श्री. रघुनाथ गणपती पाटील यांचे मालकीचे मौजे हिरवडे दुमाला ता. करवीर येथील एकूण रक्कम रुपये 10049800/- (1 कोटी 49 हजार 800 रु. ) त्र्यंबक विनायक पाटील, म.वा. तेजस्वीनी त्र्यंबक पाटील, नम्रता दिग्विजय पाटील, ओंकार त्र्यंबक पाटील यांचे मालकीचे मौजे कसबा बीड ता. करवीर येथील एकूण रक्कम रुपये -984452/- (9 लाख 84 हजार 452 रु. ) श्री. सर्जेराव कृष्णा शिपुगडे यांचे मालकीचे मौजे हणमंतवाडी ता. करवीर येथील एकूण रक्कम रुपये 40,85,065/-(40 लाख 85 हजार 65 रु. ) उदयसिंग शंकरराव पाटील यांचे मालकीचे मौजे कावणे ता. करवीर येथील एकूण मुल्यांकन रक्कम रु 2004857/-/-(20 लाख 4 हजार 857 रु. )
लिलावाच्या शर्ती खालीलप्रमाणे-
वरील मालमत्तेची मुल्यांकन किंमत 1 कोटी, 76 लाख 69 हजार 97 रुपये इतके असून यापेक्षा कमी बोली स्विकारली जाणार नाही. लिलाव मंजूर अंतरावर पूर्ण केला जाईल. ज्यांच्या नावे लिलाव पूर्ण होईल त्याने 1/4 रक्कम तात्काळ भरावयाची आहे. लिलाव मंजूर झाल्यानंतर लिलावधारकांना समज दिल्यापासून तीन दिवसात उर्वरित 3/4 रक्कम जमा करावयाची आहे. वरील अट क्र. 4 मधील पूर्तता न केल्यास फेरलिलाव केला जाईल व त्यात बोली कमी आल्यास अशी कमी पडणारी रक्कम पूर्वी जमा केलेल्या 1/4 रकमेतून वजा केली जाईल. थकबाकीदाराने लिलाव पुकारल्यानंतर 30 दिवसाच्या आत संपूर्ण थकबाकी, नोटीस फी, लिलाव पुकारल्याचा खर्च इत्यादी खर्च जमा करुन लिलाव रद्द करण्यास सक्षम अधिकाऱ्याकडे विनंती केल्यास लिलाव ज्याच्या नावे मंजूरी अंतरावर पूर्ण केला आहे त्यास बोली रक्कमेच्या 5 टक्के रक्कम मानधन म्हणून अदा करावी लागेल. सक्षम अधिका-याकडून लिलाव मंजूर झाल्यानंतर विक्री प्रमाणपत्र दिले जाईल. त्या आधारे लिलावधारकास मिळकतीचा प्रत्यक्ष ताबा देण्यात येईल.