महिला लोकशाही दिनाचे येत्या सोमवारी आयोजन

0
6

प्रतिनिधी जानवी घोगळे

कोल्हापूर, दि. 10 (जिमाका) : सप्टेंबर महिन्यातील महिला लोकशाही दिन येत्या सोमवारी म्हणजेच 15 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वा .जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा महिला व बाल विकास कार्यालयाने दिली आली आहे.

महिला लोकशाही दिनास महिलांनी आपल्या तक्रारी, अडचणी शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक कराव्यात. न्यायप्रविष्ठ प्रकरणे, सेवा व आस्थापना विषयक बाबी, सामुहिक तक्रारींचे अर्ज स्विकारले जाणार नाहीत, असे आवाहनही जिल्हा महिला व बाल विकास विभागामार्फत करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here