
प्रतिनिधी जानवी घोगळे
नागपूर :
देशात बनलेल्या उत्पादनांची विक्री वाढविणे आणि स्वदेशी वस्तूंच्या प्रोत्साहनासाठी नागपूर येथे दोन दिवसीय राष्ट्रीय व्यापारी मंडळाचा मेळावा अत्यंत उत्साहात पार पडला. या मेळाव्यात देशभरातील विविध राज्यांमधून व्यापारी, संघटनांचे पदाधिकारी व उद्योग क्षेत्राशी संबंधित मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या व्यापारी मेळाव्याचे वैशिष्ट्य म्हणजे, “देशात बनलेल्या वस्तूंचा वापर व विक्री वाढविणे” हा प्रमुख संकल्प सर्व व्यापाऱ्यांनी एकमुखाने मांडला.

चर्चेतील महत्त्वाचे मुद्दे
- व्यापार पथक्रेता संघटना व व्यापाऱ्यांनी आपल्या अडचणी आणि अनुभव मांडले.
- देशाच्या अर्थव्यवस्थेला गती मिळावी यासाठी स्वदेशी उत्पादनांच्या वापराचे महत्त्व पटवून दिले.
- व्यापारात स्वदेशी वस्तूंचा जास्तीत जास्त समावेश करावा, यावर सर्वांचे एकमत झाले.
- प्रांतीय व जिल्हास्तरावर अशाच प्रकारचे व्यापारी मेळावे आयोजित करून व्यापाऱ्यांना प्रोत्साहित करण्याचा निर्णय झाला.
- तहसील व शहरांमध्ये व्यापारी संघटनांच्या माध्यमातून स्वदेशी वस्तूंचा प्रचार व जनजागृती अभियान राबविण्याचा ठराव मंजूर करण्यात आला.

प्रमुख मान्यवरांची उपस्थिती
या व्यापारी मेळाव्यात भारतीय उद्योग व्यापारी मंडळ, कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स, व्यापारी सुरक्षा मंच, कोल्हापूर येथील हॉकर्स जॉईंट ॲक्शन कमिटी, जाणीव संघटना पुणे, मुंबई संभाजी ब्रिगेड तसेच देशभरातील विविध ४० पेक्षा अधिक व्यापारी संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते.
कोल्हापूरातून हॉकर्स जॉईंट ॲक्शन कमिटीच्या अध्यक्षा सौ. निर्मला कुराडे मॅडम यांनी उपस्थित राहून स्वदेशी वस्तूंच्या प्रचारासाठी व्यापाऱ्यांना दिशा दिली.

समारोप व संकल्प
मेळाव्याचा समारोप करताना सर्व व्यापाऱ्यांनी ठराव घेतला की –
👉 भारतात फक्त स्वदेशी वस्तूंच्या विक्रीस प्रोत्साहन दिले जाईल.
👉 देशभरात व्यापारी संघटना परकीय वस्तूंवर नियंत्रण ठेवण्यासाठी जनजागृती करतील.
👉 तहसील, जिल्हा आणि प्रांतीय पातळीवर स्वदेशी व्यापारी मेळावे नियमित घेण्यात येतील.
या निर्णयामुळे देशातील स्वदेशी उत्पादनांना नवा बाजारपेठीय आधार मिळणार असून व्यापार क्षेत्रातून भारतीय अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
