
प्रतिनिधी रोहित डवरी SP-9 news
कोल्हापूर
(प्रतिनिधी) – आई अंबाबाई महालक्ष्मीच्या आशीर्वादाने गेली सात वर्षे अखंड मोफत उस रस वाटप सेवा राबवली जात आहे. गुरुवर्य गणपतराव अंदळकर यांच्या स्मरणार्थ व पैलवान संतोष पाटील, पाडळी खुर्द यांच्या संकल्पनेतून या उपक्रमाला सुरुवात झाली असून, यावर्षी या उपक्रमाला नवा रंग देत “कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त उसाचा रस प्या आणि पैठणी जिंका” अशी भव्य स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.ही स्पर्धा लहान गट व मोठा गट अशा दोन विभागांत, तसेच पुरुष व महिला अशा वेगवेगळ्या गटात होणार आहे. सहभागी होण्यासाठी सकाळी 10.00 ते 11.00 या वेळेत प्रवेश नोंदणी करावी लागणार असून नोंदणी फी 50 रुपये आहे. नोंदणी झाल्यानंतर सकाळी 11.00 वाजता स्पर्धेची सुरुवात होईल. विजेत्याला आकर्षक *पैठणी भेट* दिली जाणार आहे.या स्पर्धेचे काही महत्त्वाचे नियम आयोजकांनी जाहीर केले आहेत.* प्रवेश नोंदणी केवळ प्रत्यक्ष उपस्थित राहूनच होईल, फोनवर स्वीकारली जाणार नाही.* वेळेत हजर राहून नोंदणी केलेल्यांनाच स्पर्धेत सहभागी होता येईल.* स्पर्धेचे नियम स्थळी सांगितले जातील.* पंचांचा निर्णय अंतिम राहील.* ही स्पर्धा एकूण 9 दिवस चालणार असून विशेषतः कॉलेज विद्यार्थिनी व महिलांसाठी आयोजित करण्यात आली आहे.स्पर्धेचे ठिकाण **भवानी मंडप, तुळजाभवानी मंदिर, कोल्हापूर समोर** असे असून, दसरा सणाच्या निमित्ताने भाविकांसाठी हा उपक्रम उत्साहवर्धक ठरणार आहे.