समाजकल्याण विभागाच्या आढावा बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा

0
39

प्रतिनिधी जानवी घोगळे

जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या मान्यतेने आणि सहाय्यक आयुक्त समाजकल्याण विशाल लोंढे यांच्या उपस्थितीत समाजकल्याण विभागाच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीसंदर्भात आढावा बैठक घेण्यात आली.

या बैठकीत *प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजना, **जादूटोणा विरोधी कायदा जनजागृती प्रचार व प्रसार, **उसतोड कामगारांना ओळखपत्र वाटप, तसेच *सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्या व त्यांचे निराकरण या विषयांवर सविस्तर चर्चा झाली. याशिवाय जिल्हा दक्षता व नियंत्रण समिती आणि शिष्यवृत्ती संदर्भातील महाविद्यालयीन कामकाज यांचा देखील आढावा घेण्यात आला.

बैठकीत संबंधित विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. समाजकल्याण विभागाच्या योजनांचा लाभ पात्र नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी समन्वयाने प्रयत्न करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here