
प्रतिनिधी प्रा. मेघा पाटील
कोल्हापूर (26 Sep 2025):-पाळूस (जि. सांगली) येथील आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेजच्या वतीने तसेच कोल्हापूर येथील सायबर ट्रस्ट संचलित कॉलेज ऑफ नॉन-कन्व्हेन्शनल व्होकेशनल कोर्सेस फॉर वुमन यांच्या संयुक्त विद्यमाने पंतप्रधान उषा योजनेंतर्गत “अन्न प्रक्रिया क्षेत्रातील कौशल्य विकास” या विषयावर दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा दिनांक २६ व २७ सप्टेंबर २०२५ रोजी होणार आहे.कार्यशाळेचा शुभारंभ आज (२६ सप्टेंबर) सकाळी अकरा वाजता आनंदभवन, सीसिबेर कॅम्पस येथे झाला. उद्घाटन प्रसंगी श्री. चिराग मेहता, संचालक-गुणवत्ता नियंत्रण, भारत डेअरी फूड्स एलएलपी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच श्री. गजानन गोंगाणे, मुख्य कार्यकारी अधिकारी, रा-ईट फूड्स, कोल्हापूर यांनी कीनोट स्पीकर म्हणून मार्गदर्शन केले.पहिल्या दिवशी कार्यशाळेत “प्रोसेसिंग अँड स्टॅण्डर्ड्स : पाथवे टू क्वालिटी डेअरी प्रॉडक्ट्स” या विषयावर श्री. विवेक कुलकर्णी, प्रॉडक्शन मॅनेजर, भारत डेअरी फूड्स एलएलपी यांनी तांत्रिक सत्र घेतले. तसेच दूध व दुग्धजन्य पदार्थांचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिके सीएनसीव्हीसीडब्ल्यू महाविद्यालयाच्या अन्न प्रक्रिया प्रयोगशाळेत पार पडली.उद्या (२७ सप्टेंबर) रोजी कार्यशाळेत विविध तांत्रिक सत्रे आयोजित करण्यात आली आहेत. त्यामध्ये क्लिनिकल न्यूट्रिशनमधील थेराप्यूटिक प्रॉडक्ट्स या विषयावर सौ. अश्विनी रायबागकर, तसेच अन्न प्रक्रिया क्षेत्रातील कौशल्याधिष्ठित शिक्षणाच्या संधी या विषयावर सौ. श्वेता माने-अजागीया मार्गदर्शन करणार आहेत. त्याचबरोबर शेफ प्रसाद केसारकर यांच्या मार्गदर्शनाखाली बेकरी उत्पादन प्रक्रिया या विषयांवर प्रात्यक्षिके होणार असून कार्यशाळेचा समारोप दुपारी होणार आहे.या कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांना तसेच प्रशिक्षणार्थींना प्रत्यक्ष अन्न प्रक्रिया तंत्रज्ञानाचे कौशल्य आत्मसात करण्याची आणि उद्योग क्षेत्राशी थेट जोडले जाण्याची संधी मिळणार आहे.