
प्रतिनिधी : जानवी घोगळे
कोल्हापूर: महात्मा गांधी जयंती निमित्त महावीर महाविद्यालयाच्या समाजशास्त्र,अर्थशास्त्र व राष्ट्रीय छात्र सेना विभागाच्या वतीने महात्मा गांधी :जीवन व कार्य या विषयावर पोस्टर स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत महाविद्यालयाच्या विविध विभागातून,१०३ विद्यार्थ्यांनी पोस्टर स्पर्धेत भाग घेतला. विद्यार्थ्यांनी महात्मा गांधीजींच्या जीवन व कार्याच्या विविध पैलूंवर या पोस्टर द्वारे प्रकाश टाकला. डॉ. गोमटेश्वर पाटील व डॉ.प्रकाश कांबळे यांनी या स्पर्धेचे परीक्षण करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले ” विद्यार्थ्यांनी पोस्टरच्या माध्यमातून कोणतेही विचार मांडण्यासाठी डिजिटल साधना बरोबरच मूळ पुस्तकांचाही वापर करावा व प्रभावीपणे आपली मते मांडावीत ” असे मत दोन्ही परीक्षकांनी यावेळी व्यक्त केली.
या कार्यक्रमांच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अद्वैत जोशी होते त्यांनी आपल्या अध्यक्षीय समारोपात ” प्रत्येक काळामध्ये गांधी विचार समाजाला दिशादर्शक राहिलेले आहेत त्यामुळे आधुनिक काळात ही त्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे ” असे प्रतिपादन केले. या पोस्टर स्पर्धेमध्ये तृप्ती कोळी, ऋषिकेश जांबोनी, कादंबरी पाटील,रुमाना नदाफ यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय,तृतीय व उत्तेजनार्थ क्रमांक प्राप्त केले विजेत्या विद्यार्थ्यांना प्राचार्य डॉ अद्वैत जोशी यांच्या हस्ते बक्षीसे वितरित करण्यात आली.
डॉ.अंकुश गोंडगे, डॉ. सुजाता पाटील, डॉ. संजय ओमासे, प्रा.उमेश वांगदरे, डॉ.संदीप पाटील, प्रा. स्नेहल घोरपडे, प्रा मानसिंग पाटील, प्रा. सखाराम हुंबे यांनी या उपक्रमाचे आयोजन प्राचार्य डॉ. अद्वैत जोशी त्यांच्या मार्गदर्शनाखाली केले. यावेळी डॉ.शरद गायकवाड, डॉ शशिकांत पाटील, प्रा.प्रकाश चव्हाण, डॉ अश्विनी कोटणीस, प्रा.संध्या जाधव याच्या सह एन.सी.सी. छात्र, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थिती होते.