
प्रतिनिधी : रोहित डवरी
महात्मा फुले सभागृह वानवडी पुणे येथे पार पडलेल्या रीजनल टीचर्स असोसिएशन रत्नागिरी यांच्या वतीने समाजातील आदर्शवंत लोकांचा पुरस्कार आणि सन्मान करण्यात आला. आपापल्या क्षेत्रात प्रामाणिकपणे काम करून समाजाच्या उज्वल भविष्यासाठी येणाऱ्या पुढच्या पिढीला आपल्या कर्तुत्वातून चांगला संस्कार देण्याचे काम समाजातील काही लोक करत असतात. अशा लोकांना त्यांच्या कार्याची समाजातून पोचपावती म्हणून त्यांच्या कार्याला उत्साह प्रेरणा मिळावी आणि ते कार्य निरंतर त्यांच्या हातून घडो यासाठी रिजनल टीचर्स असोसिएशन रत्नागिरी यांच्या वतीने अनेक लोकांचा सत्कार आणि सन्मान करण्यात आला.

यावेळी रयत शिक्षण संस्थेचे महात्मा गांधी विद्यालय रुकडी चे प्राचार्य श्री आर डी माने यांच्या कार्याची दखल घेत पुणे येथे महात्मा फुले सभागृह वानवडी सभागृहामध्ये त्यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरवण्यात आले या अगोदर प्राचार्य आर डी माने यांना त्यांच्या कार्याची दखल घेत अनेक पुरस्कार मिळाले. यामध्ये तालुका, जिल्हा, आणि राज्य स्तरीय पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.

प्राचार्य आर डे माने यांना मिळालेल्या पुरस्कारामुळे त्यांच्या चाहत्या वर्गात एक आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच त्यांच्यावर राजकीय सामाजिक यासारख्या अनेक क्षेत्रातील लोकांच्याकडून कौतुकांचा वर्षा होत आहे.
यावेळी बोलताना प्राचार्य आर.डी माने म्हणाले की या पुरस्कारामुळे काम करण्यासाठी अजून प्रेरणा मिळाली याबद्दल त्यांनी रिजनल टीचर असोसिएशन रत्नागिरी या संस्थेच्या आभार मानले.
यावेळी उपस्थित श्री कुलकर्णी सर, शुभम पांडे ,भरत पाटील, राष्ट्रीय कार्याध्यक्ष योगेश शिरसाट, राष्ट्रीय अध्यक्ष श्री संजय सर, विशाल निकम, प्रियांका काशीद, पुणे पोलीस महासंचालक बनावडें सर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम सोहाळा संपन्न झाला.