बेरोजगार सेवा सहकारी संस्थांनी 16 ऑक्टोबरपर्यंत प्रस्ताव सादर करावेत

0
22

प्रतिनिधी :जानवी घोगळे

कोल्हापूर, दि. 9 (जिमाका) : शिक्षणाधिकारी (प्राथ.) जि.प.,कोल्हापूर अंतर्गत कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय, गगनबावडा मॉडेल क्र.4 (इयत्ता 9 वी ते 12 वी) येथे गृहप्रमुख (दोन वर्षाचा गृहप्रमुख पदाचा अनुभव असल्यास प्राधान्य) एका पदासाठी 10 महिन्यांच्या कालावधीसाठी रूपये 28,875/- प्रतिमहा मानधन,कार्यकारी अभियंता, मध्यम प्रकल्प विभाग क्र.2, कोल्हापूर येथे वाहनचालक- 2 पदांसाठी 11 महिन्यांसाठी 13 हजार 330 रुपये प्रतिमहा मानधन, प्राचार्य, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, शिरोळ ता.शिरोळ येथे एक सफाई कामगार पदासाठी 11 महिन्यांच्या कालावधीसाठी रूपये 493/- प्रतिदिन (सुट्टीचे दिवस वगळून) मानधन, सहायक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता कोल्हापूर येथे सफाई कामगार एका पदासाठी 11 महिन्यांच्या कालावधीसाठी रूपये 194.25/- प्रतिदिन (सुट्टीचे दिवस वगळून) मानधनावर नियुक्ती करावयाची आहे. वरील कामे गगनबावडा, करवीर, शिरोळ तालुक्यातील असून याप्रमाणे कामे करण्यास इच्छुक तालुका, कोल्हापूर जिल्हा, कार्यक्षेत्र असणा-या कार्यरत व खालील अटी व शर्ती पूर्ण करणा-या बेरोजगार सेवा सहकारी संस्थांनी इच्छापत्रासह 16 ऑक्टोबरपर्यंत प्रस्ताव सादर करावेत.

अटी व शर्तीबाबत कार्यालयाशी संपर्क साधावा. अटी व शर्ती पूर्ण करणा-या कार्यरत सेवा सहकारी संस्था यांनी आपल्या इच्छापत्रासह प्रस्ताव आवश्यक त्या कागदपत्रांसह 16 ऑक्टोबर पर्यंत या कार्यालयास सादर करावेत, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त जमीर करीम यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here