ई-आर-1 विवरणपत्र 31 ऑक्टोबरपर्यंत भरा

0
19

प्रतिनिधी :जानवी घोगळे

कोल्हापूर, दि. 9 (जिमाका) : सर्व शासकीय, निमशासकीय, केंद्र शासन व राज्य शासन अंगिकृत व खासगी क्षेत्रातील सर्व आस्थापनांनी त्यांच्या कार्यालयाचे ई-आर-1 विवरणपत्र 31 ऑक्टोबर पर्यंत ऑनलाईन पध्दतीने भरावे, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त जमीर करीम यांनी केले.

माहे सप्टेंबर 2025 रोजी संपणाऱ्या तिमाहीची ई-आर-1 (त्रैमासिक) सर्व सार्वजनिक क्षेत्रातील शासकीय, निमशासकीय व खासगी क्षेत्रातील सर्व आस्थापनांकडून त्यांच्या आस्थापनेवर असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांच्या मनुष्यबळाची सांख्यिकी माहिती (पुरुष, स्त्री एकूण) संकलीत करण्याचे काम चालू आहे. सांख्यिकी विभागाकडून यापूर्वीच युझरनेम व पासवर्ड देण्यात आले आहेत. ई-आर 1 विवरणपत्र सांख्यिकी माहिती प्रत्येक तिमाही नंतर महिन्याच्या 1 ते 30 तारखेपर्यंत भरणे आवश्यक आहे.

अधिक माहितीसाठी कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक 0231-2545677 वर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. तसेच कौशल्य विकास व उद्योजकता विभागाचे www.rojgar.mahaswayam.gov.in संकेतस्थळ पहावे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here