
प्रतिनिधी :रोहित डवरी
पलूस /कुंडल
सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील कुंडल येथील गट क्रमांक2724 आणि गट क्रमांक2753 हा कुंडल – वाझर रस्ता शेतकऱ्यांच्यासाठी खुला करावा. यासाठी उपोषणाला सुरुवात झाली आहे.शेतकऱ्यांच्या उपोषणासाठी अनेक संघटना, राजकीय पक्ष ,ग्रामस्थ आणि गावातील तरुण मंडळ यांच्याकडून वाढता पाठिंबा असून देखील;शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी उभा राहिलेल्या या लढ्यामध्ये प्रशासकीय यंत्रणा आपली भूमिका स्पष्ट करत नाही. काही शेतकऱ्यांच्यामुळे आत असणाऱ्या शेतीसाठी कायमस्वरूपी वाट मिळत नाही.म्हणून कॉम्रेड वैभव काका पवार यांच्या समवेत अनेक शेतकरी पलूस तहसीलदार कार्यालयाच्या दारात उपोषण करत आहेत. या उपोषण करताना पाठिंबा देण्यासाठी आमदार विश्वजीत कदम, आमदार अरुण अण्णा लाड, क्रांती दूध चेअरमन किरण लाड, शिवसेना उद्धव ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, शिवसेना एकनाथ शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, आरपीआय, महिला फेडरेशन. गावातील ग्रामस्थ यासारख्या दिग्गज लोकांनी प्रत्यक्ष पाठिंबा देऊन देखील पलूस तहसीलदार कार्यालय हा प्रश्न निकाली काढत नाहीत. यावरून कोणता राजकीय दबाव आहे का? अशी शंका उपस्थित होत आहे.

सांगली जिल्हाधिकारी, खासदार विशाल पाटील, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, यांना देखील निवेदन द्वारा शेतकऱ्यांचे व्यथा मांडण्यात आली. तरीही कोणतेही ठोस कारवाई आजपर्यंत करण्यात आले नाही.
यावेळी वैभव काका पवार बोलत असताना म्हणाले, शेतकऱ्यांना योग्य तो न्याय नाही मिळाला तर आंदोलनाची दिशा अजून तीव्र करण्यात येईल. यावेळी होणाऱ्या नुकसानास प्रशासन यंत्रणा जबाबदार असेल. अशा तीव्र शब्दात पुढील आंदोलनाचे संकेत दिले आहे.

यावेळी उपोषण करते कॉम्रेड मोहन बापू जाधव, कॉम्रेड महादेव लाड, लक्ष्मण लाड, विकास लाड, श्रीरंग आवटे, गावातील ग्रामस्थ, महिला, शेतकरी वर्ग उपस्थित होता…


