महिला शेतकऱ्यांसाठी २३ जानेवारी रोजी मुंबईत चर्चासत्र

0
24

प्रतिनिधी : जानवी घोगळे

· कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते होणार चर्चासत्राचे होणार उदघाटन

· कृषी विभाग आणि एमएस स्वामीनाथन रिसर्च फाउंडेशन यांचा संयुक्त उपक्रम

मुंबई,दि.१९: महाराष्ट्र सरकारचा कृषी विभाग आणि एमएस स्वामीनाथन रिसर्च फाउंडेशन (एमएसएसआरएफ) यांच्या संयुक्त विद्यमाने महिला शेतक-यांच्या विविध विषयाच्या अनुषंगाने २३ जानेवारी २०२६ रोजी मुंबईत चर्चासत्र होणार आहे.या चर्चासत्राचे उद्घाटन कृषीमंत्री दत्तात्रय भरणे, कृषी राज्य मंत्री ॲड आशिष जयस्वाल यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृह येथे हॉल क्रमांक ४ येथे सकाळी १० वाजता होणार आहे.

कृषी विभागाने आणि एमएस स्वामीनाथन रिसर्च फाउंडेशन (एमएसएसआरएफ) यांच्यात आणि महिला सक्षमीकरण, संसाधन हक्क, पोषण सुरक्षा, लिंग न्याय, पर्यावरणीय शाश्वतता शेतकरी समृद्धी मजबूत करण्यासाठी मदत करणारे व्यापक धोरण तयार करण्यासाठी आणि अंमलबजावणी कार्यक्रमांची आखणी करण्यासाठी संयुक्तपणे सामंजस्य करार केला आहे. या करारातंर्गत शेतकरी महिलांसाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. याच उपक्रमांतर्गत या विविध विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या चर्चासत्राला कृषि विभागाचे अपर मुख्य सचिव विकास चंद्र रस्तोगी, एमएस स्वामिनाथन रिसर्च फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ.सौम्या स्वामीनाथन, कुमारीबाई, व्दारकाताई, सल्लागार समितीचे डॉ.गोविंद केळकर,सीमा कुलकर्णी, एमएस स्वामीनाथन रिसर्च फाउंडेशनच्या कार्यकारी संचालक डॉ. आर. रेंगलक्ष्मी, मीरा सौदरराजन यांची व्याख्याने होणार आहेत. हे चर्चासत्र सकाळी १० ते २ या वेळेत होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here