
कोरोची | प्रतिनिधी : जानवी घोगळे
भाजप–महायुतीच्या अधिकृत उमेदवार कु. सानिका राहुल आवाडे (दीदी) यांनी आज कोरोची जिल्हा परिषद मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यानिमित्त आयोजित भव्य नामांकन रॅलीमध्ये भाजप व महायुतीच्या कार्यकर्त्यांचा प्रचंड उत्साह आणि कोरोचीवासियांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला. या जोरदार शक्तिप्रदर्शनामुळे कोरोची जिल्हा परिषद मतदारसंघात विजयाचा गुलाल भाजपाच उधळणार आणि पुन्हा एकदा कमळ फुलणार, असा ठाम विश्वास कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी निघण्यापूर्वी आवाडे परिवारातील सदस्यांनी इंदुकला या निवासस्थानी कु. सानिका राहुल आवाडे (दीदी) यांचे औक्षण करून त्यांना शुभेच्छा दिल्या. पारंपरिक पद्धतीने झालेल्या या शुभारंभामुळे कार्यकर्त्यांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले.

त्यानंतर कु. सानिका राहुल आवाडे (दीदी) यांनी तहसीलदार कार्यालय, हातकणंगले येथे आपला उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांकडे दाखल केला. यावेळी माजी मंत्री प्रकाशआण्णा आवाडे, आमदार डॉ. राहुल आवाडे साहेब, माजी आमदार सुरेशराव हाळवणकर साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.
या प्रसंगी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, सौ. स्वरूपा पाटील यड्रावकर, सौ. मोश्मी आवाडे वहिनी, अजय पाटील यड्रावकर, प्रसाद खोबरे, यशवंत वाणी, तारदाळच्या सरपंच वैशाली पोवार, खोतवाडीचे सरपंच विशाल खोत, माणगावचे सरपंच राजू मगदूम यांच्यासह नगरसेवक, विविध पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच युवक-युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नामांकन रॅलीदरम्यान ‘पुन्हा एकदा कमळ फुलणार’, ‘भाजप–महायुती जिंदाबाद’ अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला. सर्वसामान्य नागरिकांचा मिळालेला उत्स्फूर्त पाठिंबा आणि संघटनेची ताकद पाहता कोरोची जिल्हा परिषद मतदारसंघात भाजप–महायुतीचा विजय निश्चित असल्याचा आत्मविश्वास यावेळी नेत्यांनी व्यक्त केला.



