
कोतोली प्रतिनिधी पांडुरंग फिरींगे
कोतोली जिल्हा परिषद मतदारसंघात जनसुराज्य शक्ती पक्षाच्या प्रचाराला आज जोरदार सुरुवात झाली. जिल्हा परिषद उमेदवार सौ. संगीता शंकर पाटील आणि कोडोली पंचायत समितीचे उमेदवार सुनील महिपती चौगुले यांनी कोतोली परिसरात प्रत्यक्ष मतदारांच्या भेटी घेत आशीर्वाद मागत प्रचाराचा शुभारंभ केला.घराघरांत जाऊन संवाद साधताना विकास, विश्वास आणि पारदर्शक कारभाराचा संदेश देण्यात आला. या प्रचार फेरीला मतदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून जनसुराज्य पक्षाच्या उमेदवारांबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.यावेळी माजी सरपंच अंजली सुनील चौगुले, महिला विठ्ठल पतसंस्थेच्या चेअरमन संजीवनी कांबळे, हनुमान उद्योग समूहाचे संचालक प्रशांत पाटील, एम. डी. पाटील, गणेश पाटील, विठ्ठल पाटील, हिंदुराव लव्हटे यांच्यासह जनसुराज्य शक्ती पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.“जनतेच्या विश्वासातूनच खरा विकास साधता येतो. कोतोली मतदारसंघाचा सर्वांगीण विकास हेच आमचे ध्येय आहे,” असा विश्वास उमेदवारांनी व्यक्त केला.या प्रचार दौऱ्यामुळे कोतोली मतदारसंघात जनसुराज्य शक्ती पक्षाचे वारे जोरात वाहू लागल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे.

