
पाचगाव प्रतिनिधी पांडुरंग फिरींगे
पाचगाव जिल्हा परिषद मतदारसंघात काँग्रेस पक्षाच्या प्रचाराला आज जोशपूर्ण सुरुवात झाली. जिल्हा परिषद उमेदवार संग्राम गोपाळराव पाटील आणि पाचगाव पंचायत समितीच्या उमेदवार सीमा संग्राम पोवाळकर यांनी पाचगाव परिसरात प्रत्यक्ष मतदारांच्या भेटी घेत आशीर्वाद मागत प्रचाराचा शुभारंभ केला.
घराघरांत जाऊन मतदारांशी संवाद साधताना काँग्रेसच्या विकासाभिमुख धोरणांचा, लोकाभिमुख निर्णयांचा आणि स्थानिक प्रश्नांच्या सोडवणुकीचा ठाम संदेश देण्यात आला. या प्रचार फेरीला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून पाचगाव मतदारसंघात काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.
यावेळी सरपंच प्रियांका संग्राम पाटील, उपसरपंच दिपाली गाडगीळ यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी एकजुटीने प्रचारात सहभाग घेत काँग्रेसच्या विजयाचा निर्धार व्यक्त केला.
“जनतेच्या विश्वासावरच खऱ्या अर्थाने विकासाची पायाभरणी करता येते. पाचगावच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आम्ही कटिबद्ध आहोत,” असा विश्वास उमेदवारांनी व्यक्त केला.
या प्रचार दौऱ्यामुळे पाचगाव जिल्हा परिषद मतदारसंघात काँग्रेसच्या प्रचाराला नवी ऊर्जा मिळाल्याचे चित्र दिसून येत आहे.

