जात पडताळणी प्रक्रियेमध्ये अनियमितता आढळल्यास कारवाई – पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांचे निर्देश..

0
21

जिल्ह्यात 1 लाख 40 हजार कुणबी नोंदी, 30 हजार 800 जात प्रमाणपत्रांचे वितरण*

कोल्हापूर दि. 27 : शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेले शासन निर्णय, परिपत्रके यानुसार जिल्ह्यात आत्तापर्यंत आढळलेल्या 1 लाख 40 हजार 531 कुणबी नोंदीनुसार वितरित करण्यात आलेल्या जात प्रमाणपत्रांच्या पडताळणीमध्ये अनियमितता आढळल्यास संबंधित कार्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश पालकमंत्री प्रकाश अबिटकर यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात त्यांनी जिल्ह्यातील कुणबी, मराठा–कुणबी व कुणबी–मराठा नोंदी बाबत व जात पडताळणी प्रक्रिये बाबत आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्यासह जात पडताळणी समिती सदस्य भारत केंद्रे, सदस्य सचिव संभाजी पवार, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, उपजिल्हाधिकारी महसूल डॉ. संपत खिलारी आणि संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. आत्तापर्यंत कोल्हापूर जिल्ह्यात 1 लाख 40 हजार 531 कुणबी नोंदी आढळल्या आहेत. यातील सर्व नोंदींचे स्कॅनिंग झाले आहे. तसेच संकेतस्थळावर सर्व नोंदी अपलोड करण्यात आले आहेत. आत्तापर्यंत 31 हजार 622 जणांनी प्रमाणपत्रासाठी अर्ज दाखल केले पैकी 30,800 जात प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. यामधील जून अखेर 9237 जणांना जात प्रमाणपत्र पडताळणी कार्यालयाकडून प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. या बैठकीत पालकमंत्री अबिटकर यांनी आलेल्या तक्रारीनुसार जात पडताळणी कार्यालयात अनियमितता आढळून येत असल्याचे सांगितले. यापुढे कोणत्याही प्रकारे चुकीची बाब आढळून आल्यास संबंधितावर कारवाई केली जाईल. तसेच संबंधित तक्रारदाराच्या उपस्थितीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात सुनावणी घेऊन संबंधितावर कारवाई होईल असेही त्यांनी यावेळी संबंधित विभागाला सूचना केल्या. यावेळी पालकमंत्री यांनी महसूल विभागामार्फत वेगवेगळ्या 14 विभागांच्या सहाय्याने शोधलेल्या नोंदी व त्याबाबत केलेल्या कार्यवाही बाबत समाधान व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here