हद्दवाढीशिवाय निवडणुका होणं हे कोल्हापूरच्या हिताचं ठरणार नाही..

0
21

प्रतिनिधी : जानवी घोगळे

🛑शिवशाही फाऊंडेशन कोल्हापूर तर्फे:
🟠 जाहीर निवेदन

विषय : कोल्हापूर शहराची हद्दवाढ — “आत्ता नाही तर कधीच नाही” — हद्दवाढ झाल्याशिवाय निवडणुका घेऊ नयेत.

मा. मुख्यमंत्री,
मा. नगरविकास मंत्री,
मा. जिल्हाधिकारी कोल्हापूर,
मा. आयुक्त, कोल्हापूर महानगरपालिका.

सादर प्रणाम,

कोल्हापूर शहर हे ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि औद्योगिक दृष्ट्या पश्चिम महाराष्ट्रातील अग्रगण्य शहर आहे. मात्र दुर्दैवाने गेल्या ५३ वर्षांपासून या शहराच्या हद्दीत एक इंचही वाढ झालेली नाही. १९७२ मध्ये ठरवलेली हीच सीमारेषा आजही कायम आहे, ही परिस्थिती अत्यंत अन्यायकारक आणि विकासासाठी अडथळा ठरणारी आहे.

दरवेळी शासन स्तरावर “हद्दवाढ होईल” अशी आश्वासने दिली जातात, बैठका होतात, सर्वेक्षणे केली जातात, परंतु प्रत्यक्षात अंमलबजावणी मात्र होत नाही.
✅निवडणुकांच्या तोंडावर “हद्दवाढीनंतर निवडणुका होतील” असे सांगून पुन्हा जैसे थे निवडणुका घेतल्या जातात आणि हद्दवाढ प्रक्रिया पुन्हा ५ वर्षे रखडते.

🔸 वस्तुस्थिती :

कोल्हापूर शहराच्या सीमेजवळ अनेक उपनगरांमध्ये लोकसंख्या, घरबांधणी, उद्योग व शैक्षणिक संस्था वाढल्या आहेत.

ही क्षेत्रे प्रत्यक्षात शहराचा भाग बनली आहेत, पण प्रशासकीयदृष्ट्या बाहेर राहिल्याने नागरिकांना मूलभूत सुविधा (पाणी, रस्ता, सांडपाणी, कचरा व्यवस्थापन, वाहतूक, शाळा, आरोग्यसेवा) मिळत नाहीत.

महानगरपालिकेवर लोकसंख्येच्या प्रमाणात निधी अपुरा पडतो, त्यामुळे विकास कामे अर्धवट राहतात.

शासन दरबारी हद्दवाढीच्या प्रस्तावांना मान्यता मिळत नाही हे शहराच्या प्रगतीला पायबंद ठरत आहे.

🔸 आमची ठाम भूमिका :

शिवशाही फाऊंडेशन कोल्हापूर तर्फे आम्ही ठामपणे मागणी करतो की —

“हद्दवाढ झाल्याशिवाय कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुका घेऊ नयेत.”

💥आज हीच वेळ निर्णायक आहे.
✅आत्ता नाही तर कधीच नाही.
जर पुन्हा एकदा जैसे थे निवडणुका झाल्या, तर पुढील ५ वर्षे शहर विकास ठप्प राहील आणि कोल्हापूर शहर १९७२च्या चौकटीत अडकून बसेल.

🔸 आमच्या मागण्या :

  1. प्रलंबित हद्दवाढ प्रस्तावास तत्काळ शासनमान्यता द्यावी.
  2. नव्याने समाविष्ट होणाऱ्या उपनगरांचा समावेश करून नगररचना आराखडा (DP) अद्ययावत करावा.
  3. हद्दवाढीचा निर्णय होईपर्यंत निवडणुकीची अधिसूचना जारी करू नये.
  4. या संदर्भात जनतेशी सुसंवाद साधण्यासाठी सार्वजनिक सुनावणी आयोजित करावी.

🔸 निष्कर्ष :

कोल्हापूर शहराची हद्दवाढ ही राजकीय विषय नसून जनतेच्या हक्काचा आणि शहराच्या भविष्याचा प्रश्न आहे.
राजर्षी शाहू महाराजांनी दिलेल्या लोककल्याणकारी परंपरेनुसार, न्याय्य व सर्वसमावेशक निर्णय घेणे ही काळाची गरज आहे.

म्हणूनच शिवशाही फाऊंडेशन तर्फे आम्ही शासनास ठामपणे आवाहन करतो की —

“हद्दवाढीशिवाय निवडणुका होऊ देऊ नयेत.”

आपला विश्वासू,
✍🏻 सुनिल सामंत संस्थापक अध्यक्ष शिवशाही फाऊंडेशन, कोल्हापूर
भ्रमणध्वनी क्रमांक 9130395006
ई-मेल: *sunilsamant014@gmail.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here