प्रतिनिधी : जानवी घोगळे
कोल्हापूर, दि. 28 (जिमाका): मराठा लाईट रेजिमेंट यांच्याद्वारे माजी सैनिक संपर्क मेळावा (OUTREACH PROGRAMME FOR ESM) (संपर्क अभियान) दिनांक 7 डिसेंबर (रविवार) रोजी सकाळी 8.30 ते 4 वाजेपर्यंत (स्थळ शिवाजी मैदान, मराठा लाईट रेजिमेंटल सेंटर) बेळगावी येथे आयोजित केला आहे. जिल्ह्यातील सेवानिवृत्त झालेले अधिकारी, माजी सैनिक/माजी सैनिक विधवा/वीरपत्नी/ वीरमाता व त्यांचे अवलंबित यांना सैन्यातील, सुविधा, नवीन धोरणे व त्याबाबतच्या येणाऱ्या अडीअडचणींचे निराकरण करण्यात येणार आहे. जास्तीत जास्त लाभार्थींनी उपस्थित राहुन तक्रारींचे निवारण करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्यांनी केले आहे.
मेळाव्यास येताना आधार कार्ड, स्वतःचा मोबाईल नंबर, डिस्चार्ज पुस्तक, ओळख पत्र, पी पी ओ ची छायांकित प्रत व बँक पास बुक घेवून यावे, असे आवाहन रेकॉर्डस् मराठा लाईट रेजिमेंट द्वारे करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी रेकॉर्डस् मराठा लाईट रेजिमेंट व्हाट्सअॅप क्र. 8317350584 वर कार्यालयीन वेळेत दूरध्वनीवर संपर्क साधावा.

