प्रतिनिधी :जानवी घोगळे
कोल्हापूर, दि. 28 (जिमाका) : सामाजिक न्याय विभागाच्या शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या अनुसुचित जाती तथा नवबौध्द घटकातील इयत्ता 11 वी 12 वी तसेच 12 वी नंतरच्या व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण घेता यावे. भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधा विद्यार्थ्यांना स्वत: उपलब्ध करुन घेण्यासाठी आवश्यक रक्कम विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर थेट जमा करण्यासाठी शासनाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरु केली, असून सन 2025-26 या शैक्षणिक वर्षाकरिता पात्र विद्यार्थ्यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी https://hmas.mahait.org/ या वेबसाईटवर 30 नोव्हेंबर पर्यंत ऑनलाईन करावेत, असे अवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त सचिन साळे यांनी केले आहे.
या योजनेकरिता विद्यार्थ्याने महानगरपालिका, महसुली विभाग, जिल्हा व तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या शैक्षणिक संस्थेत प्रवेश घेतलेला असावा. अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षासाठी सामाजिक न्याय विभागाच्या शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज केलेला व प्रवेश क्षमतेअभावी प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांनी या योजनेसाठी अर्ज करता येईल. तसेच व्दितीय, तृतीय, चतुर्थ वर्षात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज करण्याची आवश्यकता नाही, असेही समाज कल्याण विभागामार्फत पत्रकाव्दारे कळविण्यात आले आहे.

