
प्रतिनिधी :सागर ठाणेकर
कोल्हापूर,
कोल्हापूर येथील सावली केअर सेंटर आणि भारत विकास परिषद, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या मोफत कृत्रिम अवयव शिबिराचा मॉड्युलर अवयव हस्तांतर सोहळा आज (दिनांक) कोल्हापूर येथे उत्साहात पार पडला. ७० ते ८० हजार रुपये किंमत असलेले हे कृत्रिम अवयव गरजू दिव्यांग बांधवांना या सोहळ्यात अगदी मोफत वाटण्यात आले.

दोन टप्प्यात आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात प्रथम मापन आणि त्यानंतर हस्तांतरण (Fitting) प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. कोल्हापूर जिल्ह्यासह सांगली, नांदेड, मुंबई आणि पुणे अशा विविध ठिकाणांहून आलेल्या २०१ लाभार्थी दिव्यांग बांधवांनी या शिबिराचा लाभ घेतला.
कार्यक्रमाची प्रस्तावना सावली केअर सेंटरचे श्री. किशोर देशपांडे यांनी केली. याप्रसंगी श्री. विनय खटावकर यांनी मनोगत व्यक्त करताना कृत्रिम अवयवांच्या योग्य वापरासंदर्भात महत्त्वपूर्ण सूचना दिल्या.

या सोहळ्यासाठी श्री. राहुल सोलापूरकर, श्री. मंदार जोग, श्री प्रकाश मेहता आणि श्री. उदय गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमात श्री. राहुल करमरकर यांनी सावलीच्या ‘मातुल’ प्रकल्पासाठी ११,०००/- (अकरा हजार) रुपयांची देणगी जाहीर केली.
सावली केअर सेंटर आणि भारत विकास परिषदेचे स्वयंसेवक दिव्यांगांच्या सेवेसाठी या सोहळ्यादरम्यान तत्पर होते, त्यांच्या सहकार्यामुळे हा उपक्रम यशस्वीरित्या पार पडला.



