श्री भैरव देवस्थान सल्लागार समिती खोची यांच्या रक्तदान शिबिरास उस्फूर्त प्रतिसाद..

0
377

प्रतिनिधी :रोहित डवरी

श्री क्षेत्र भैरवनाथ मंदिर खोची येथे रविवार निमित्त भैरवनाथ मंदिरामध्ये भाविकांची अलोट गर्दी असते. सध्या जिल्ह्यामध्ये असणाऱ्या अपुऱ्या रक्त साठ्यामुळे रक्तदान शिबिराचा आयोजन श्री भैरवनाथ सल्लागार समिती खोची यांच्या वतीने घेण्यात आले. यावेळी समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष व सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.

भैरवनाथ मंदिरात घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरामुळे भक्तगण आणि ग्रामस्थ यांच्यातून या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. यावेळी भाविक भक्तांच्या मधून या रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला अचानक झालेल्या या नियोजनामध्ये तब्बल 50 भाविक भक्तांनी आपले रक्तदान दिले आहे. अनेक महिलांनी ही आपले रक्तदान केले आहे.आपलं रक्त एखाद्या रुग्णाला उपयोगी पडेल या भावनिक संवेदनेतून एक सेवा म्हणून रक्तदान केल्याचे अनेक भक्तांनी आपले मत प्रकट केले.

यावेळी प्रत्येक रविवारी आणि पौर्णिमेला भैरव देवस्थान सल्लागार समिती यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन केले होते. रविवारची औचित्य साधून बाळूमामा बाजार चे मालक महादेव बंडगर उर्फ एमबी यांनी अन्नदान केले होते. अन्नदान आणि रक्तदान हे दोन्ही उपक्रम अति उत्साहात भाविकांच्या साक्षीने पार पाडण्यात आला. या दोन्ही उपक्रमासाठी अथक प्रयत्न श्री भैरव देवस्थान सल्लागार समिती चे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव आणि पदाधिकारी गावचे ग्रामस्थ सेवेकरी गुरव गोसावी नाथपंथी डवरी समाज यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला.

या उपक्रमासाठी विशेष सहकार्य हिंदरत्न प्रकाश बापू पाटील ब्लड सेंटर सांगली संपूर्ण टीम डॉक्टर आणि स्टाफ यांचे विशेष सहकार्य लाभले. या उपक्रमाचे नियोजन किरण पाटील, पवन थोरवत ,बापू बडोदकर ,संभाजी थोरवत, यशवंत काटकर ,संभाजी काटकर ,जयसिंग कोळी , पोपट पाटील,विकास चव्हाण, जगदीश पाटील भैया ,अनिल पाटील ,बाळासाहेब पाटील ,कृष्णात यशवंत, राजकुमार पाटील, व अध्यक्ष दादासो पाटील इतर पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here