
प्रतिनिधी : पांडुरंग फिरिंगे
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची धडाकेबाज कारवाई!कोल्हापूर प्रतिनिधी आगामी निवडणूक पार्श्वभूमीवर बेकायदेशीर अग्निशस्त्रे व दारूगोळा बाळगणाऱ्यांवर कारवाईचे आदेश मा. पोलीस अधीक्षक श्री. योगेश कुमार गुप्ता यांनी दिल्यानंतर, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अचूक माहितीच्या आधारे धडक कारवाई करत २० जिवंत राऊंडसह एका आरोपीस अटक केली आहे.गोपनीय माहितीच्या आधारे पोलिस उपनिरीक्षक शेष मोरे यांच्या पथकाने हॉटेल गोकुळ, हळदी (ता. करवीर) येथे सापळारचून ऋषीराज विजय पाटील (वय 36, रा. सडोली खालसा, ता. करवीर) यास ताब्यात घेतले. त्याच्या झडतीत ₹20,000 किंमतीचे 20 जिवंत काडतुसे मिळून आली. त्याच्याविरुद्ध करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. योगेश कुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, उपनिरीक्षक शेष मोरे, व अंमलदार अतिष म्हेत्रे, सुरेश पाटील, प्रविण पाटील, दिपक घोरपडे, सत्यजित तानुगडे, सतिश सुर्यवंशी, राजेंद्र ताटे, सुशिल पाटील व सागर चौगुले यांच्या पथकाने यशस्वीपणे पूर्ण केली.

