प्रतिनिधी : जानवी घोगळे
दि. 13 (जिमाका): उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) क्र. 6. जिल्हाधिकारी कार्यालयातील मोबदला वाटपाबाबत किंवा कोणत्याही कामासाठी कोणताही कर्मचारी अथवा त्रयस्थ व्यक्ती पैशांची मागणी करत असल्यास त्यास बळी पडू नये. तसेच याबाबत उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) क्र. 6. यांच्याकडे समक्ष भेटून त्यामध्ये कोणत्याही कामामध्ये शंका असल्यास शंका निरसन करुन घ्यावे. सोमवार व शुक्रवार या दिवशी कार्यालयीन वेळेत अभ्यागतांना भेटीसाठी वेळ देण्यात आलेली आहे. त्याशिवाय इतर दिवशीही उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) क्र. 6. हे कोणत्याही बैठकीत व्यस्त नसतील तर त्यांना भेटून आपले प्रश्न सोडवावेत, असे आवाहन भूसंपादन उपजिल्हाधिकारी अर्चना नष्टे यांनी केले.भूषण महावीर पाटील, बापूसो बाळगोंडा पाटील व सावित्री बापूसो पाटील, सर्व रा. रेंदाळ ता. हातकणंगले कोल्हापूर यांनी उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) क्र. 6. जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापुर कार्यालयाकडे मौ. रेंदाळ, ता. हातकणंगले येथील गट नं. 987 मधील क्षेत्र 0.60 हे. आर जमीन दूधगंगा डावा कालवामध्ये संपादन झालेली असल्याने मोबदला मिळण्याबाबत 4 सप्टेंबर रोजी अर्ज दिला होता. त्रुटी पुर्ततेनंतर उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) क्र. 6 यांचे समक्ष संबंधित खातेदारांना स्वाक्षरीकरिता बोलविण्यात आले होते. 12 नोव्हेंबर रोजी आधारकार्ड पडताळणी पूर्ण केल्यानंतर मोबदला वाटप व्हॉवचरवर संबंधित खातेदार यांची समक्ष स्वाक्षरी घेऊन उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) क्र. 6. यांनी स्वाक्षरी केलेली होती.ही घटना प्रकरणांवर स्वाक्षरी झाल्यानंतर घडलेली आहे. त्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालय कोल्हापूर यांच्याकडून 12 नोव्हेंबर रोजी झालेल्या घटनेमध्ये जिल्हाधिकारी कार्यालय तसेच उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) क्र. 6. जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर यांचा कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट होते. ही वस्तुस्थिती असून उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) क्र. 6. हे नागरिकांना भेटीसाठी कार्यालयीन वेळेत उपस्थित असतात. कार्यालयीन कामाजातही ई-ऑफीस प्रणालीचा दैनंदिन वापर केला जात असून त्याव्दारे नागरिकांच्या अर्जावर मुदतीत कार्यवाही केली जाते, असेही उपजिल्हाधिकारी भूसंपादन कार्यालयामार्फत पत्रकाव्दारे कळविण्यात आले आहे.

