
कोल्हापूर प्रतिनिधी पांडुरंग फिरींगे
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) येथे ७२ व्या अखिल भारतीय सहकार सप्ताहाचे औचित्य साधून संघाच्या ताराबाई पार्क मुख्य कार्यालयात चेअरमन नविद मुश्रीफ यांच्या हस्ते सहकार ध्वज वंदन करण्यात आले. यावेळी उपस्थित सर्वांनी सहकार प्रतिज्ञा उच्चारून सहकार चळवळीप्रती निष्ठा व्यक्त केली.
भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या १३६ व्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून गौरव करण्यात आला.
या प्रसंगी बोलताना चेअरमन नविद मुश्रीफ म्हणाले,
“सहकार हा ग्रामीण विकासाचा कणा आहे. गोकुळने शेतकरी आणि दूध उत्पादकांच्या आर्थिक उन्नतीसाठी सातत्याने काम केले आहे. पुढेही सेवा, सुविधा आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सहकाराची ताकद अधिक बळकट करण्याचे प्रयत्न अविरत सुरू राहतील.”
यावेळी जिल्ह्यातील सर्व सहकारी दूध संस्था, दूध उत्पादक, अधिकारी व कर्मचारी यांना सहकार सप्ताह आणि बालदिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक डॉ. एम.पी. पाटील यांनी केले.
तर डॉ. प्रकाश साळुंखे यांनी आभार प्रदर्शन केले.
कार्यक्रमास चेअरमन नविद मुश्रीफ, माजी चेअरमन व ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, संचालक अरुण डोंगळे, बाबासाहेब चौगले, किसन चौगले, कर्णसिंह गायकवाड, संभाजी पाटील, कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले, पशुसंवर्धन व्यवस्थापक डॉ. प्रकाश साळुंखे, संकलन व्यवस्थापक एस.व्ही. तुरंबेकर, दत्तात्रय वाघरे, डॉ. प्रकाश दळवी, महिला नेतृत्व विकास अधिकारी मृण्मयी सातवेकर, जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील, अशोक पुणेकर तसेच इतर अधिकारी, महिला स्वयंसेविका व कर्मचारी उपस्थित होते.

